पाण्याच्या मागणीची ग्रामपंचायतीने दखल न घेतल्याने मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर (लामाणतांडा) मधील महिलांनी पंचायत समिती पुढे केले आंदोलन

मंगळवेढा/वार्ताहर

बालाजीनगर (लामाणतांडा) येथील नागरिकान कडून प्रत्येकी 1 हजार रुपये घेवून नळ बसवण्यात आला होता मात्र या नळाला पाणी येण्याची वाट येथील नागरिकांना पहावी लागत आहे,ग्रामपंचायतीने एका खाजगी जागेत बोअर पाडून पाण्याची व्यवस्था केली होती मात्र जागा मालकानी येथून पाणी घेवून जाऊ नका मी पाणी देणार नाही असे येथील महिलांनी बोलताना सांगितले.

ग्रामपंचायतीने खाजगी जागेच बोअर घेतलाच कसा ? हा बोअर घेण्यासाठी करार पण केला नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. बालाजीनगर (लामाणतांडा)  ता.मंगळवेढा येथे गेल्या चार महिन्यापासून पाणी  येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील महिलांना घागरी घेऊन वणवण  फिरावे लागत आहे. पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीकडे गेल्यावर त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून बालाजीनगर (लामाणतांडा) येथील महिलांनी सोमवारी दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता चक्क पंचायत समिती पुढे थांड मांडून  बसल्या.महिला आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंचायत समिती ने व ग्रामपंचायतीने  ठोस आश्सासन दिल्याने महिलांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला. या आंदोलनानंतर सरपंच,ग्रामविकास अधिकारी आदींनी पहाणी करुन संबंधित  आंदोलनकर्ते महिलांना अस्वच्छतेचे सावट दूर करु, पाण्यासाठी बोअर मारुन एक  ते दोन दिवसात हा पाण्याची सोय करुन देऊ, असे आश्वासन पंचायत समितीच्या व  ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व  अधिका-यांनी दिले.


या आंदोलनात सुमन चिंगू पवार,हिराबाई हेमंत पवार,शांताबाई बंडू  पवार,सुशीला गोरख पवार,विमल धोंडीराम पवार,ललिता प्रकाश पवार,भीमाबाई गोरख पवार,जनाबाई धनसिंग पवार,वालाबाई धनसिंग पवार,मिधाबाई मच्छिंद्र पवार,खतिजा साहेबराव नदाफ,महादेवी रामया हिरेमठ,ललिता शिवाजी  पवार,सुनीता संतोष स्वामी आदी महिलांनी सहभाग नोंदविला असून गट विकास   अधिकारी यांना अर्ज दिला असून या अर्जावर त्यांच्या सहया आहेत.

सदर घटनेची माहिती घेत असताना सरपंच फूलसिंग पवार यांनी ही माहिती  कशाला घेताय माहिती पेपर मध्ये छापू नका ,माहिती घेतलेला कागद सरपंच पवार यांनी हातातून हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला आहे असून या सरपंचावर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोट- बालाजीनगर (लामाणतांडा) येथील सरपंच यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाई केली जाईल.-राहुल गावडे,प्रभारी गट विकास अधिकारी,मंगळवेढा 

फोटो ओळी- बालाजीनगर (लामाणतांडा) येथील महिलांनी गावात चार  महिन्यापासून पाणी येत नाही म्हणून पंचायत समिती पुढे थांड मांडून बसल्या  असल्याचे दिसत आहे.
**********************


 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 821 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 259 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 821 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399