वाखरी येथे समाधान (दादा) आवताडे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019

 वाखरी ता. पंढरपूर येथील लोखंडे वस्ती, प्लॉट एरिया येथील हायमास्टचा लोकार्पण सोहळा व शिलाई मशीन तसेच गॅस शेगडयाचे वितरण चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांच्या शुभहस्ते व मा.श्री. सचिनजी शिवशरण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

समाजाचे हित जोपासण्यासाठी व समाजातील सर्वच गटातील लोकांना विविध शासकीय योजना, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ वेगवेगळ्या फंडातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वाखरी येथील हायमास्ट लोकार्पण सोहळाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी श्री. संत दामाजी सह. साखर कारखाण्याचे चेअरमन मा. श्री. समाधान (दादा) आवताडे यांनी व्यक्त केले.                   



या प्रसंगी बोलता दादा म्हणाले की आम्ही गेली कित्येक वर्ष पंढरपूर मंगळवेढा मध्ये समाज उपयोगी योजना राबवत असून या माध्यमातून आम्ही नोकरी महोत्सव मध्ये १७८० सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरी मिळऊन दिली तसेच जयपूर फूट च्या माध्यमातून हात पाय नसणाऱ्या १७० अपंगाना मोफत कृत्रिम हात पाय वाटप करण्यात आले. तसेच गुरुवार दि. ७ मार्च २०१९ रोजी समाधान (दादा) आवताडे युवा मंच व समाजसेवक संतोष कवडे मित्र परिवरच्या वतीने सर्व धर्मीय सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.  या वेळी बोलताना सचिनजी शिवशरण यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना मिळून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे म्हणाले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून वाखरी गावच्या सरपंच मथुराबाई मदने, ग्रामसेवक अरविंद कुंभार, विठ्ठल सह. साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले, समाजसेवक संतोष कवडे, मुन्ना मलपे, अविनाश मोरे, महमद मुलाणी ग्रा. सदस्य रामचंद्र पांढरे, रघुनाथ पोरे, सचिन चव्हाण, इलाई मुजावर, संग्राम गायकवाड, उमेश नगरे, बाळासाहेब लेंगरे, तानाजी लोखंडे, चंद्रकांत मस्के, नाना पोरे, सदाशिव मस्के, सुनील गायकवाड, संजय अभंगराव, सुधाकर गायकवाड, वैभव ननवरे, रमेश लोखंडे, मधुकर पोरे, हैबती पोरे, शिवाजी हाके, सुभाष शिंदे, नवनाथ शिंदे, दाऊत शेख, यूसुब शेख, जब्बू मुजावर, भीमराव हिवरे, रावसाहेब पोरे, सुरेश लोखंडे, महेश मस्के, अमर लोखंडे, बालाजी जाधव, अमर शेख, रवी जाधव, आसिफ शेख, कलीम शेख, कल्याण जगताप, दिनेश शेळके, भैया बागडे, शहाजी बोंबाळे, शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान (दादा) आवताडे युवा मंच वाखरी येथील सर्व कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले तर आभार रामचंद्र पांढरे यांनी मानले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com