पंढरपूर लाईव्ह कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी... नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांची प्रमुख उपस्थिती

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019




पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात आज दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करुन राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करण्यात आले. 

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या अंगी असलेला करारी बाणा व राष्ट्राभिमान प्रत्येक स्त्रीनं अंगीकारावा. सन्मानानं, स्वतंत्र जगण्यासाठीचा व स्वराज्याप्रती निष्ठा व त्याग फुलवण्याचा राजमातेनं दिलेला संदेश आपल्या मुलांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न सर्व महिलांनी करावा. अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यासाठीचं बळ आपल्या मुलांच्या मन आणि मनगटात भरवताना महिला भगिणींचा सन्मान ठेवण्याचा व गरजवंतांच्या मदतीला धावुन जाण्याची नैतीकता जपण्याचा बाळकडुही आपल्या मुलांना देण्याची जबाबदारी माझ्या माता-भगिणींनी पार पाडणं ही काळाची खरी गरज असल्याचे मत यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी व्यक्त केले.

 यावेळी पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे, निलेश आगावणे, चि.भोसले आदी उपस्थित होते. 













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com