पंढरपूर तालुक्यातील तुंगतजवळ भीषण अपघात... गोपाळपूरच्या स्वेरी काॅलेजच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यु तर स्वेरीचे विश्वस्त दादासाहेब रोंगे गंभीर जखमी

पंढरपूर LIVE 16 डिसेंबर 2018



अपघातातील मृत शिक्षकेत्तर कर्मचारी



 अपघातात चक्काचुर झालेली बोलेरो गाडी

  पंढरपूर- मोहोळ मार्गावर पंढरपूर तालुक्यातील तुंगत नजीक झालेल्या भीषण अपघातात गोपाळपूर च्या स्वेरी काॅलेजचे दोन कर्मचारी ठार झाले असुन स्वेरीचे विश्वस्त दादासाहेब रोंगे हे गंभीर जखमी झाले असल्याचे समजते. 

आज सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाला.  सागर शामराव लोंढे व प्रशांत दत्तात्रय पाटोळे  हे दोन कर्मचारी अपघातात मृत्युमुखी पडले असून रोंगे यांच्यावर सोलापूर मधील अश्विनी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

 मोहोळ वरून पंढरपुरला येत असताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या बोलेरो या गाडीला आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवताना ही गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com