नरसिंग गिरजी मिल ची जागा रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी देण्याबाबत शासनाकडे अहवाल पाठवू:- मा. जिल्हाधिकारी

पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018


 नरसिंग गिरजी मिल ची जागा रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठीच देण्यात यावा या मागणीसाठी आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीने युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की नरसिंग गिरजी मिल हे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे स्थानिक वृत्तपत्रातून आम्हास ही माहिती मिळाली की सदरची जागा ही शासकीय कार्यालयांना देण्याचे प्रस्तावित आहे. या आधी या जागेवर गारमेंट पार्क उभा करण्याचे नियोजित होते. पण हे न करता शासनाने ही जागा शासकीय कार्यालयाला दिली तर याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होईल ही मिल ची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या जागी जर रोजगार निर्मिती करणारे उदयोगांना दिले तर सोलापुरात उद्योग वाढीस मदत होऊन याचा फायदा अनेक सोलापूर शहरातील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून आज या ठिकाणी आपणास निवेदनाद्वारे आम्ही आज असे मागणी करत आहात की ही नरसिंग गिरजी मिल ची जागा रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठीच देण्यात यावी असे नगरसेवक विनोद भोसले म्हणाले

    यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत म्हणाले की आपल्या निवेदनाचा नक्की विचार करून या नरसिंग गिरजी मिल च्या जागेवर रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी जागा देण्यात यावी अशी मागणी सोलापूर वासियांची असल्याचे अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे यावेळी पदाधिकारी यांना सांगितले.

यावेळी महेश लोंढे, प्रवीण जाधव, विवेक कन्ना, राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, सुभाष वाघमारे, सोहेल शेख, शरद गुमटे, गणेश गायकवाड, अशोक कलशेट्टी, रोहित भोसले, निखिल पवार, उमेश तिवाडी, दीपक फुले, अभिषेक गायकवाड, अनिल गायकवाड, शिराज मुल्ला, शिवराज कोरे, अमीर तलवार, सौरभ साळुंके, मोहसीन शेख, शशी उपाडे, मोहनिष घंटे, रोहित हुलसुरे, असलम शेख, विनायक भंडारे, अनिल मनलोर, मारू करगुळे, गौतम मंचाले, प्रसाद पवार, आकाश कदम, मेहबूब तांबोळी, आदी उपस्थित होते.













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com