कासेगावच्या लोटस इंग्लिश स्कूलचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश.

पंढरपूर LIVE 2 नोव्हेंबर 2018



पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) मधील लोट्स इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहोदया कॉम्पलेक्स सोलापूर मैदानी स्पर्धा २०१८-१९ या सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी याठिकाणी संपन्न झालेल्या विविध मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे लोट्सच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
            कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलकासेगाव मधील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी शर्वरी मोरे बुक बॅलन्स स्पर्धेत  तृतीय क्रमांकवैष्णवी ताटे हिने अडथळा शर्यत स्पर्धेत द्वितीय क्रमांकशैलेश अवताडे हा अडथळा शर्यत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.१२ वर्षाखालील विद्यार्थी सलोनी गुंगे ही रोप स्किपिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक, अविष्कार गुंगे शटल रन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला तर १४ वर्षाखालील विद्यार्थी पूर्वा अवताडे ही लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांकअस्मिता ताड ही थाळी फेकमध्ये द्वितीय क्रमांक,दिग्विजय घाडगे हा गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील वयो गटात दिग्विजय खिलारे हा भालाफेकमध्ये  तृतीय क्रमांकदीपक जाधव हा अडथळा शर्यत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. क्रीडा मार्गदर्शक मयुर वागज व सौ अस्मिता घोलप यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सोलापूर जिल्हातून एकूण ९ सी.बी.एस.ई शाळांमधून तब्बल ३६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष भिमराव रोंगेउपाध्यक्ष हणुमंत बागल, खजिनदार दादासाहेब रोंगेसचिव डॉ. बी. पी. रोंगे व संस्थेचे पदाधिकारी व वतर विश्वस्त आणि प्राचार्य डॉ.जयश्री चव्हाण, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.




















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com