जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018

         सोलापूर दि. 26 :- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व  गुणवंत खेळाडू यांना जिल्हा स्तरीय क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन 2018 सालासाठी देण्यात येणाऱ्या  जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी इच्छुकांनी 12 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
                             


जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरूप रोख 10,000/ प्रमाणपत्र व स्मृतीचीन्ह असे आहे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गूणवंत क्रीडा कार्यकर्ता व तीन गूणवंत खेळाडू ( एक पूरूष, एक महिला व एक दिव्यांग खेळाडू) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्जदाराचे त्या  जिल्ह्यातील सलग 15 वर्षे वास्तव्य आवश्यक आहे, पुरस्कारासाठी 1 जुलै वे 30 जून या कालावधीतील कामगिरी विचारात घेण्यात येईल.
         








गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गूणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्यासाठी असणारी पात्रता, निकष, मान्य खेळ, याबाबतची सर्वकष आणि विहित नमुन्यातील अर्जाचे नमुने जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयात उपलब्ध आहेत.
       इच्छुक व पात्र व्यक्तीनी जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, क्रीडा संकुल,  कुमठा नाका, सोलापूर (दूरध्वनी क्रमांक 0217-2607144) येथे  संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही असे, जिल्हा क्रिडा अधिकारी , सोलापूर यांनी कळविले आहे.  




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com