निरा-भटघरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या आक्रोश...तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018



 निरा-भाटघर धरणाचे पाणी तिसंगी सोनके तलावात न सोडल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या गेटवर चालून शासनाचा निषेध करीत पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. यावर्षीच्या पावसाळी हंगामात निरा-भाटघर धरण १०० टक्के भरल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणी या धरणाखालील तलावात सोडणे अपेक्षित होते.  मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाव भरुन न घेता हे पाणी भीमा नदीत सोडून दिले.


पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. निरा-भटघरच्या पाणी वाटपात या तलावातील पाण्याचा प्रामुख्याने समावेश असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन काळजीपूर्वक केले नाही. या तलावातील पाण्यावर केवळ शेती नाहीतर अनेक गावच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत.


तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाला आहे या तलावात वेळीच पाणी न सोडल्यास परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरु करावे लागतील.तलावात पाणी सोडावे यासाठी आ. भारत भालके यांनी प्रयन्त केले जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले मात्र पाणी सोडले नाही.या भागातील लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने पाणी सोडण्याची गरज आहे अन्यथा या भागातील शेतकऱ्यांनाच्या उद्रेकेला सामोरे जावे लागेल. 



 या आंदोलन प्रसंगी माजी सरपंच विजय पवार, शेतकरी संघटनेचे अशोक पवार, संजय कारंडे, सर्जेराव जाधव, बाळदादा चव्हाण, तानाजी खरात, दिपक मासाळ, दादा शेळके, आनंद आंबुले, आप्पा रणदिवे, सागर खरात, विजय ढोणे, नितीन जाधव, विजय खरात, नवनाथ वाघमोडे, शहाजी कारंडे, विकी गुरव, महादेव गवळी, किरण चंदनशिवे, बबन जाधव, नितीन चंदनशिवे, नवनाथ गाडेकर आदी उपस्थित होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com