सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची प्लेसमेंट मध्ये दमदार एंन्ट्री

Pandharpur Live 20 September 2018

१२२३ विद्यार्थ्यांची एक्सेंचर, कॉग्निझंट, इन्फोसिस अशा नामांकित कंपनीत निवड
    पंढरपूर (प्रमोद बनसोडे) अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटने” अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ताजगातील नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना नोक-या देऊन सिद्ध केले असून या वर्षी “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटला” सलग्न असणाऱ्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून जगात नामांकित असलेल्या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्याच ड्राईव्ह मध्ये “एक्सेंचर कंपनीमध्ये-६६५, कॉग्निझंट-२६९, इन्फोसिस-२८९” असे एकूण १२२३ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता प्रा. जे. एन. पितांबरे यांनी दिली.
     अभियांत्रिकी शिक्षणात क्षेत्रात “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटने” वेगळी ओळख निर्माण केली आहे. चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पुणे येथील प्लेसमेंट ड्राईव्ह मधून “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” ला सलग्न असलेल्या विविध महाविद्यालयातून एक्सेंच रया बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये-६६५, कॉग्निझंट-२६९, इन्फोसिस-२८९” असे एकूण १२२३ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. हि निवड प्रक्रिया पुणे येथील सिंहगड संस्थेत घेण्यात आली होती. सिंहगड संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. सिंहगड संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत असून गुणवत्ता पुर्ण शिक्षण देत आहेत. सिंहगड संस्थेतील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून इंजिनिअरचा किंगमेकरस्टार इंजिनियर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजीनियर फक्त “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” मधील महाविद्यालयात मध्ये घडविले जात आहेत.
    विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकीसामाजिक भानराष्ट्राच्या,समाजाच्या हितासाठीउन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण सिंहगडच्या प्रत्येक संस्थेमध्ये दिले जात आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे आणि “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” मध्ये स्वतंत्र “ट्रेनिंग आणि प्लेसमेंट” विभाग असल्यामुळे  या वर्षी  सिंहगड इन्स्टिट्यूट मधून १२२३ विद्यार्थी “एक्सेंचर, कॉग्निझंट, इन्फोसिस” या नामांकित कंपन्यात आज मोठ्या प्रमाणावर निवडले गेले आहेत.
    विद्यार्थ्याना ध्येयाकडे प्रेरित करणारे शिक्षक व शिक्षण व्यवस्था “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” ने जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊन सिद्ध केले आहे. सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अभ्यासपुर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम तज्ञ प्राध्यापक करीत आहे. भारतासाठी एक टिकाऊ भविष्य घडविण्यासाठी “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सिंहगड संस्थेत कुशलअनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच पी.एच.डी धारक प्राध्यापक असून या प्राध्यापकच्या ज्ञानाचा फायदा “सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट” मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.
      अल्पावधीतच सातत्यपूर्ण, उत्कृष्ट शैक्षणिक निकाल व प्लेसमेंटमध्ये अग्रेसर असणारी सिंहगड संस्था हि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकीसामाजिक भानराष्ट्राच्या,समाजाच्या हितासाठीउन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण दिले जाते आहे म्हणूनच चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्याच ड्राईव्ह मध्ये १२२३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे पालकांमध्ये व विद्यार्थ्यामध्ये उत्साही व आनंदी वातावरण निर्माण झाले असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com