जेंष्ठ पत्रकार राजा माने यांची पदोन्नतीवर बदली... लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण जबाबदारी...

पंढरपूर LIVE 16 आॅगस्ट  2018



 मुंबई - दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक, जेंष्ठ पत्रकार राजा माने यांची मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून लोकमत समूहाच्या राजकीय संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 राजा माने हे 2012 पासून सोलापुर येथे संपादक म्हणून कार्यरत होते. 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकमत व्यवस्थापनाने त्यांच्यावर राजकीय संपादक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जाते.
माने यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेला राजकीय अभ्यास, उत्तम जनसंपर्क असल्याने माने हे आव्हान लीलया पेलतील असा विश्वास व्यवस्थापनाला आहे.
त्यामुळेच हे शिवधनुष्य लोकमत समुहाचे सर्वेसर्वा राजेंद्रबाबू आणि ऋषीबाबू दर्डा यांनी राजा माने यांच्या खांद्यावर ठेवल्याचे बोलले जाते.
राजा माने यांच्यावर गेल्या सहा वर्षांपासून सोलापूर आवृत्तीच्या संपादक पदाची जबाबदारी होती या कार्यकाळात माने यांनी केवळ पत्रकारिता न करता पत्रकारितेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर आदी समाज घटकांना व्यासपीठ मिळवून दिले होते.
माने यांच्या पदोन्नतीवरील बदली नंतर त्यांच्या जागी सातारा लोकमत आवृत्तीचे संपादक सचिन जवळकोटे हे पदभार घेणार आहेत.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com