पंढरपूर शहरातील वाहतुक मार्गात बदल... भिमा नदी पुल ते अर्बन बँक रस्त्याचा समावेश

पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट  2018


      पंढरपूर,दि.27: शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत  नगरपालीकेमार्फत भिमा नदी पुल –मटन मार्केट ते अर्बन बँक येथील  रस्त्याचे कॉक्रीट करण्याचे काम करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी  दिनांक  23 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2018 याकालवधीत  रात्री  12.00 वाजेपर्यत संबधित ठिकाणी वाहतुक करण्यास तात्पुरते निर्बंध घालण्यात येत आहे.
            शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी सोलापूर, मोहोळ, शेटफळ चौक, टेंभुर्णी कामती कडून तीन रस्त्ता मार्गे,  मटन मार्केट, अर्बंन बँक मार्गे शहरात येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. वाहनांना शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तीन रस्ता-शेटफळ चौक, आहिल्यादेवी चौक, नवीन सोलापूर नाका, सरगम चौक मार्गे येवून वाहने  इच्छित स्थळी जातील. 
            शहरातून अर्बन बँक, मटन मार्केट, अंबाबाई पंटागण  येथून तीन रस्त्याकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना सहकार चौक, इंदिरा गांधी चौक येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून   सहकार चौक, सरगम चौक, नवीन सोलापूर नाका, अहिल्यादेवी चौक मार्गाने  इच्छित स्थळी वाहने  जातील. 
शहरातील अतंर्गत वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी अर्बन बँक, अनिल नगर, उपजिल्हा रुग्णालय, अंबाबाई पटांगण या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करु नये. सदरचा रोड नो पार्कींग करण्यात आला  आहे. तसेच अंबाबाई पटांगण ते   भजनदास चौक या रस्त्यावरुन अंतर्गत वाहतुक होत असल्यामुळे हा रस्ता नो पार्कींग करण्यात आला आहे.         



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com