स्वेरीत आज पत्रकारबांधवांना मिळणार पत्रकारितेतील दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन..! पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन...

पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट  2018

 सोलापूर विद्यापीठसोलापूर व स्वेरी यांचा संयुक्त उपक्रम
पंढरपूर- सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये आज मंगळवारी,दि.२८ ऑगष्ट  २०१८ रोजी पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या विषयावर खास पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली असून याची सामुर्ण तयारी अंतिम टप्यात आली असल्याचे दिसून येत असून याची माहिती सर्व दूर पोचली आहे.
       स्वेरीमध्ये अनेक सर्वोपयोगी उपक्रम होत असतात. त्यामुळे पत्रकारांसाठी देखील कार्यशाळा व्हावी अशी अनेकांची असलेली इच्छा आज पूर्णत्वास येत आहे. खास पत्रकारासाठी आयोजिलेल्या पत्रकारिता काल आज आणि उद्या’ ही कार्यशाळा आज (मंगळवार,दि.२८ ऑगष्ट २०१८) होत असून सकाळी ९.३० ते १०.०० ह्या वेळेत नोंदणी व अल्पोपहार झाल्यानंतर ठीक १०.०० वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोलेउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडेपंढरपूरचे  तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधीलपत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र  चिंचोलकर हे उपस्थित राहणार आहेत. उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात वृत्तवाहिन्यांचे महत्व आणि मर्यादा’ या विषयासंबंधी साम टिव्हीमुंबईचे संपादक निलेश खरे हे मार्गदर्शन करणार असून यासाठी पंढरपुरातील दैनिक पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे हे अध्यक्षस्थानी असतील. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रिंट मिडियाचे भवितव्य काय ?’ या विषयावर मुंबईचे माध्यमतज्ञ युवराज मोहिते हे मार्गदर्शन करतील यासाठी दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकांत कांबळे अध्यक्ष असणार आहेत. दुपारी १.०० ते १.३० दरम्यान भोजनाचे आयोजन तर कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात पर्यायी माध्यमांचे प्रयोग’ या विषयावर मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर हे मार्गदर्शन करणार असून यासाठी दैनिक सकाळसोलापूरचे सहसंपादक अभय दिवाणजी हे अध्यक्ष असणार आहेत. दुपारी २.३० नंतर सुरु होणाऱ्या सत्रात चिपळूण मधील श्रमिक सहयोगचे कार्यवाह राजन इंदुलकर (वंचितांच्या घटकातील मुलांचे शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून वरील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कार्यशाळेत मार्गदर्शन झालेल्या विषयावर खुली चर्चा होणार आहे. समारोप प्रसंगी दैनिक पुढारीचे (पंढरपूर विभाग) उपसंपादक, जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर कार्यशाळेतील सहभागी झाल्या बद्धल उपस्थित पत्रकारांना प्रमाणपत्र वाटप केले जाईल आणि चहापानानंतर सदरच्या कार्यशाळेची समाप्ती होईल. सदरची कार्यशाळा ही निशुल्क आहे. त्यासाठी काल पर्यंत राज्यभरातील अनेक पत्रकारांनी नाव नोंदणी केली आहे. अजूनही  www.sveri.ac.in या संकेत स्थळावर पत्रकार नाव नोदणी करू शकतात. या कार्यशाळेला सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य,स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे  



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com