स्वेरी कॉलेजच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन..
पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट 2018
पंढरपूर - स्वेरी कॉलेजच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
दि.28 ऑगस्ट रोजी तीन सत्रांमध्ये संपन्न होणार्या या कार्यशाळेमध्ये साम टिव्हीचे संपादक निलेश खरे ,माध्यम तज्ञ युवराज मोहिते, मॅक्स, महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर, दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपळनेरकर, पत्रकारिता आणि जन संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, साम टि.व्ही चे संपादक निलेश खरे, दै. सकाळचे सहसंपादक अभय दिवाणजी, दै. लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, श्रमिक सहयोग चे कार्यवाहक राजन इंदुलकर आदि मान्यवरांचे मार्गदर्शन पत्रकारांना लाभणार आहे. ‘पत्रकारिता आणि जन संज्ञापन’, वृत्तवाहिन्यांचे महत्व आणि मर्यादा’, ‘पिंट मिडीयाचे भवितव्य काय’, ‘पर्यायी माध्यमांचे प्रयोग’ अदी विषयांवर वरील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या कार्यशाळेत उपस्थित राहू इच्छिणार्या पत्रकार बांधवांनी प्रा.करण पाटील - 9595921154 व हलकुडे सर - 9545553628 या मोबाईलवर संपर्क साधावा किंवा ुुुर्.ीींशीळ.रल.ळप या वेब साईटवर आपली नांव नोंदणी करावे.
सदर कार्यशाळेस राज्यातील पत्रकारांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व संस्थेचे सचिव डॉ.दादासाहेब रोंगे यांनी पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.
येत्या २८ ऑगस्ट रोजी स्वेरीत पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन
-समन्वयक व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांची माहिती
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरी यांचा संयुक्त उपक्रम
पंढरपूर- ‘समाजाला ताकत देण्याचे काम ‘पत्रकार’ अहोरात्र करत आहेत ही बाब अभिनंदनीय आहे. लोकशाही देशात पत्रकारितेला ‘चवथा स्तंभ’ म्हणून गौरविले जाते हे काही उगीच नाही ! हा स्तंभ येणाऱ्या बदलत्या काळामध्ये समाज परिवर्तनात मोलाची कामगिरी ठरण्यासाठी त्यास स्वतःचे सामर्थ्य वाढविले पाहिजे यासाठी एकत्र बसून वारंवार चिंतन करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि स्वेरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये येत्या मंगळवारी,दि.२८ ऑगष्ट २०१८ रोजी ‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या विषयावर खास पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करत आहोत.’ अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील पत्रकारासाठी आयोजिलेल्या ‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या कार्यशाळेविषयी जेष्ठ विश्वस्त रोंगे पत्रकारांना सविस्तर माहिती देत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविल्यामुळे पत्रकारांच्या वतीने पत्रकार अभिराज उबाळे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्यामुळे पत्रकार अभय जोशी यांच्या हस्ते डॉ. रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविकात सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘समाजाला सामर्थ्य देण्याचे काम पंढरपूरात अनादी काळापासून चालत आले आहे. ‘जेंव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले जाते. त्याच उद्देशाने पंढरपूर नगरीच्या कुशीत गोपाळपूरच्या माळरानावर श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर (स्वेरी) या संस्थेने सन १९९८ साली ‘अभियांत्रिकी महाविद्यालय’ हे लहानसे रोपटे लावले. आज हा परिसर आपणा सर्वांच्या योगदान मिळाल्यामुळे बहरलेला दिसतो आहे. ‘एन.बी.ए.’, ‘नॅक’ अशी मानांकने प्राप्त आहेत. स्वेरीने गुणवत्तेमध्ये भरारी घेतल्याचे आपण पहात आहोतच. संपूर्ण महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी शिक्षणाची सध्याची अवस्था पाहता ‘स्वेरी’ने मिळविलेले यश हे निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे आणि हे सर्व आपण सर्व करीत असलेल्या सहकार्याने हे शक्य झाले आहे.’ पत्रकार संकेत कुलकर्णी यांनी ‘पत्रकारांसाठी पंढरपुरात कार्यशाळा व्हावी हे पत्रकारांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येत असून या कार्यशाळेसाठी राज्यातील सर्व पत्रकारांपर्यंत सदरची माहिती पोचवू व कार्यशाळेसाठी आवशक्य मदत करू.’ अशी ग्वाही दिली.
मंगळवार,दि.२८ ऑगष्ट २०१८ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० ह्या वेळेत नोंदणी व अल्पोपहार झाल्यानंतर ठीक १०.०० वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन होणार असून पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील ‘पत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर हे उपस्थित राहणार आहेत. उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘वृत्तवाहिन्यांचे महत्व आणि मर्यादा’ या विषयासंबंधी साम टिव्ही, मुंबईचे संपादक निलेश खरे हे मार्गदर्शन करणार असून यासाठी दैनिक दिव्य मराठी, सोलापूरचे निवासी संपादक संजीव पिंपरकर हे अध्यक्षस्थानी असतील. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘प्रिंट मिडियाचे भवितव्य काय ?’ या विषयावर मुंबईचे माध्यमतज्ञ युवराज मोहिते हे मार्गदर्शन करतील यासाठी दैनिक सकाळ, सोलापूरचे सहसंपादक अभय दिवाणजी अध्यक्ष असणार आहेत. दुपारी १.०० ते १.३० दरम्यान भोजनाचे आयोजन तर कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात ‘पर्यायी माध्यमांचे प्रयोग’ या विषयावर मॅक्स, महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर हे मार्गदर्शन करणार असून यासाठी लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक सचिन जवळकोटे हे अध्यक्ष असणार आहेत. दुपारी २.३० नंतर सुरु होणाऱ्या सत्रात चिपळूण मधील श्रमिक सहयोगचे कार्यवाह राजन इंदुलकर (वंचितांच्या घटकातील मुलांचे शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून वरील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कार्यशाळेत मार्गदर्शन झालेल्या विषयावर खुली चर्चा होणार आहे. समारोप प्रसंगी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे अध्यक्षस्थानी तर जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर कार्यशाळेतील सहभागाप्रित्यर्थ सर्वाना प्रमाणपत्र वाटप केले जाईल. आणि चहापानानंतर सदरच्या कार्यशाळेची समाप्ती होईल. सदरची कार्यशाळा ही निशुल्क असणार आहे. तथापी त्यासाठी नोंदणी आवश्यक असून www.sveri.ac.in या वेबसाईटवर पत्रकारांनी नाव नोदणी करणे आवश्यक आहे. पत्रकारांसाठी असलेल्या या राज्यस्तरीय कार्यशाळेसंबंधी अधिक माहितीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील (९५९५९२११५४) व संतोष हलकुडे (९५४५५५३६२८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे. पत्रकार परिषदेला सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, कार्यशाळेचे समन्वयक स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com