गुरूवारी अटलजींच्या अस्थिंचे पंढरीतील चंद्रभागेत विसर्जन
पंढरपूर LIVE 22 आॅगस्ट 2018
पंढरपूर : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे गुरूवारी सकाळी सोलापुरात आणणार आहेत. दुपारपर्यंत सोलापूरकरांना या अस्थी कलशाचे दर्शन झाल्यानंतर हा अस्थी कलश सुमारे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
पंढरपूर पंचक्रोशीतील अटलजी प्रेमींनी या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी शिवाजी चौकामधील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत अस्थी कलशाच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुपारी 4 वा. हा अस्थीकलश हुतात्मा स्मारक येथून शिवाजी चौक, चौफाळा, पश्चिमद्वार, महाद्वार पुन्हा पश्चिमद्वारमार्गे चौफाळा चौकात आणण्यात येईल. त्यानंतर चौफाळामार्गे गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, मुक्ताबाई मठ, कुंभार घाटामार्गे हा अस्थीकलश महाद्वार चौकात आणण्यात येईल. महाद्वार चौकातून महाद्वार घाटावरून भक्त पुंडलिकाच्या समोरील चौथर्यावर हा अस्थीकलश ठेवण्यात येईल. याठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधीवत पूजन करून हा अस्थीकलश चंद्रभागेमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या हस्ते विसर्जीत केला जाईल, अशी माहिती पंढरपूर शहर भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर नवी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याठिकाणी पंढरपूर तालुका, सांगोला, मोहोळ, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, माढा या भागातील वाजपेयी प्रेमींना मनात इच्छा असूनही अंत्यदर्शनाला जाता आले नाही. अशा वाजपेयी प्रेमींनी अटलजींच्या अस्थींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये वरील वेळेत उपस्थित राहावे. तसेच अस्थीकलशाच्या विसर्जनप्रसंगीही भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा, युवती आघाडी, ओबीसी आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, झोपडपट्टी सेल, वैद्यकीय सेल, युवा मोर्चाच्या पदाधिकारी, महिला व पुरूष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com