स्कोरम अभावी खर्डी ग्रामपंचायतीची ग्रामसभा तहकुब

पंढरपूर LIVE 28 आॅगस्ट  2018

खर्डी (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 15 आॅगष्ट दिवशी घेतली जानारी महत्वाची दुसरी ग्रामसभा काल गुरूवारी 30आॅगष्ठ रोजी सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आली.गावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेसाठी उपस्थित रहावे असे अवाहन ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वरती करण्यात आले होते. 
त्याअनुशंगाने ग्रामसभेच्या दिवशी   गावातील काही  नागरिकांनी आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी लेखी स्वरुपाचे अर्जही तयार केले होते.


परंतू ग्रामसभेसाठी आवश्यक असणारी लोकसंख्या (स्कोरम) दुपारी 12 पर्यंन्त पूर्ण न झाल्याने नाईलाजास्तव आजची ग्रामसभा तहकुब करण्यात येत असल्याचे सरपंच रमेश हाके यांनी जाहीर केले.विशेष म्हणजे या ग्रामसभेसाठी खुद्द ग्रामसेवक व बरेच ग्रा.पं सदस्य हजर नसल्यामुळे त्यांच्या विषयी नागरिकातून  तिव्र संताप व्यक्त केला जात होता.प्रामुख्याने ग्रामसभेचा उद्देशच असा आहे की  ग्रामपंचायतीने वर्षभरामध्ये केलेल्या सामाजिक व आर्थिक विकास कामांचा अहवाल सादर करून या पुढील  काळात करण्यात येणार्या कामासंबंधी सविस्थर खुली चर्चा करून नागरिकांतुन असणार्अया डीअडचणी दुर करने बंधनकारक असते .
याऊलट आजची तहकुब झालेली ग्रामसभा पुढील काळात कधी घेतली जानार याची माहीती न मिळाल्याने  मोठ्या अपेक्षेने काम घेऊन आलेल्या नागरिकांमधुन तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com