विठ्ठल मंदिर कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी १ मे कामगार दिनी लाक्षणिक उपोषण
पंढरपूर LIVE 27 एप्रिल 2018
पंढरपूर दि २७
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी यांचे अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यासाठी १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) मा. अप्पर कामगार आयुक्त श्री रत्नदीप हेंद्रेसाहेब यांच्या का. वि. १५९५/२०१५ आदेशाचे पालन करणे (कॅलेंडर वर्षातील १२ महिन्यातील २४० दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. )
२) आस्थापनेवरील २८७ कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध लवकरात लवकरात मंजूर करावा.
३) आकृतीबंध मंजूर होईपर्यंत किमान वेतन लागू करावा.
४) सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार जानेवारी २०१४ मध्ये संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता महाराष्ट्र शासनाकडे गेले. त्यानुसार शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना वेतन व इतर सुविधा मिळावेत.
५) मा.उच न्यायालयने मार्च २०१७ मध्ये कामगारांच्या बाजूने निकाल दिला त्याला १ वर्ष पूर्ण होऊन गेले तरी त्याची अमलबजावणी केली नाही.
६) मंदिर कर्मचारी यांना सेवा नियम लवकरात लवकर लागू करावेत.
इत्यादी मागण्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंदिर कर्मचारी छत्रपती शिवाजी चौक पंढरपूर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com