मंगळवेढ्यात गँगवारचा चंचूप्रवेश.. सर्वसामान्यांच्या मनात दहशतीचे वातावरण!

पंढरपूर LIVE 26 एप्रिल 2018

मंगळवेढ्यात गँगवारचा चंचूप्रवेश.. सर्वसामान्यांच्या मनात दहशतीचे वातावरण! 

पूर्ववैमनस्यातून भरचौकात युवकाचा खून
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येला महिना झाल्यानंतर लगेचच दुसर्‍या महिन्यात गटबाजीतून तसेच पूर्ववैमन्यसातून एकाचा भरचौकात तलवारीने मानेवर वार करून खून केला असून या हल्यात दुसरा युवकही जखमी झाला आहे. 
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याला गुंडगिरीने ग्रासले असून मोहोळ, पंढरपूर पाठोपाठा मंगळवेढ्यातही आता खून पडू लागल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हजारे गल्ली येथील सचिन ज्ञानेश्वर कलुबर्मे (वय 32) व प्रदीप हरी पडवळे (वय 27) हे दोघेजण बुधवार दि.25 एप्रिल रोजी सायं.7 वा.च्या सुमारास पानटपरीजवळ थांबले असता मागील भांडणाचा राग मनात धरून युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष बाबा शिवाजी नाईकवाडी(कोळी) व इतर पाच जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी सचिन कलुबर्मे यास तलवारीने मारहाण केल्याने त्याच्या डाव्या मानेस मोठी जखम झाली तर प्रदीप पडवळे यालाही तलवारीने मारहाण केल्यानंतर त्यांच्या डाव्या खांद्यास जखम झाली. 
या घटनेत मानेवर मोठा वार झाल्याने अति रक्तस्त्राव होवून सचिन कलुबर्मे हा बेशुध्द झाला. त्याचेवर मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

परंतु उपचारादरम्यान रात्रौ 10.10 वा.तो मयत झाला. या घटनेची खबर डॉ.बालाजी भोसले यांनी पोलीसात नोंदविली आहे. 
दरम्यान, हा प्रकार सुरू असताना मुरलीधर चौकातून एक वरात जात होती व या वरातीतील गर्दीचा फायदा घेवून हल्लेखोर घटनास्थळी आले व त्यांनी सदर हल्ला करून पसार झाले तर शहरातील व्यापार्‍यांनी आपले शटर डाऊन करून तातडीने घर गाठले.
घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख एस.विरेश प्रभू, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली व माहिती जाणून घेतली. यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनला यावेळी सुमारे 700 जणांचा जमाव जमला होता. 

पंढरपूर नंतर आता मंगळवेढ्यात ही गँगवार चा चंचू प्रवेश झाल्याचे या घटनेनंतर सिध्द झालेय... या गँगवार ला राजाश्रय मिळतोय की काय? असा प्रश्न  सर्वसामान्य माणसांच्या मनात  निर्माण झाला आहे. 





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com