सामाजिक कार्यासाठी काम करणारं युवा नेत्रुत्व- रणजित पाटील!
पंढरपूर LIVE 25 एप्रिल 2018
मोहोळ तालुक्यातील लांबोटी,सावळेश्वर,पोफळी,या भागाला राजकारणाशीवाय सामाजिक कार्याचा म्हणावा तसा इतिहास नाही.पण या सगळ्या वातावरणात ग्रामीण भागाच्या युवकांना कुठेतरी विधायक दिशा देण्यासाठी एक विधायक पाउल म्हणून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पोफळी.ता.मोहोळ येथील ग्रामीण भागातील रणजित पाटील या युवा कार्यकर्त्याने छावा संघटनेच्या माध्यमातून हत्यार हातात घेतले.
रणजित पाटील यांना महाविद्यालय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी 2015 पासून राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली ते राष्ट्रीय छावा संघटना मोहोळ तालुकाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. रचनात्मक कार्याची भाषा बोलणारा, दलित, बहूजन युवा वर्गाला आपला वाटणारा युवा सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून समाजीकतेची जान,आणि सामाजिकतेच भान ठेवून छावाच वृक्ष वाढवण्यासाठी वृक्षारोपण,वाटसरूना पाणपोई आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबूऊन त्यांच्या भविष्याचा मार्ग सुखकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
तेही कुणाच्याही वरदहस्तविना अन स्व:त समाजासाठी काहीतरी करण्याचा तळमळीने त्याचे कार्य सुरू असते. रणजित पाटील यांनी मागील उन्हाळयात सीना नदीला पाणी सोडावे यासाठी छावाच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले अन प्रयत्ननाना यश ही आले .अवकाळी पावसामुळे शेतकर्यांनच्या पिकाचे झालेले नुकसान त्याचे पंचनामे स्वतः लक्ष्य घालून करून घेणे.सरकारी अधिकार्यनमार्फत शेतकऱयांची होणारी फसवणूकिला पूर्णपणे रणजित पाटील यांनी आळा घातला आहे
हटकर समाज संघटना संस्थापक अध्यक्ष श्री भीमराव भुसनर यांनी नुकतीच रनजीत पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष म्हणुन निवड केली आहे. हा युवा कार्यकर्ता परिसरातील लोकांना आश्वासक वाटत आहे.कारण निव्वळ दिखाऊपणा करण्यापेक्षा काहीतरी समाजोपयोगी विधायक भरीव करण्याची भाषा हा बोलतो.आणि तो ती भाषा कृतीत उतरवतो.
मोहोळ कार्यक्षेत्रात भविष्यात राजकीय धुरीनाना या युवक कार्यकर्त्याला डावलता येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग ठरणार आहे. त्यांची पश्चिम महाराष्ट्र हटकर समाज संघटना युवक अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त या झुंझार छाव्याला अनेक हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com