पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण करा- नगरसेवक डि.राज सर्वगोड
पंढरपूर LIVE 27 एप्रिल 2018
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव पुढील महिन्यात मोठया उत्साहाने साजरा होणार असून हा उत्सव लक्षात घेवून पंढरपूर नगर पालीकेने तातडीने गजानन महाराज मठ परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी पंढरपूर नगर पालीकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,पुढील महिन्यात 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे.यापुर्वी या पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घेणे गरजचे झाले आहे.तर जयंती उत्सवानंतर तज्ञ वास्तुरचनाकाराकडून या परिसराच्या सुशोभीकरणाचा समर्पक आराखडा तयार करुन त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा या आशयाचे निवेदन नगर पालीकेस दिले आहे.पंढरपूर शहरात चंद्रभागेच्या तिरावर मोठ मोठे घाट बांधून,नदीस दगडी तटबंदी बांधली होती.तर प्रदक्षिणा मार्गावर दगडी रस्ते बांधून अहिल्यादेवींनी येथे येणार्या भाविकांसाठी मोठे कार्य केले होते.त्यांच्या पंढरपूरसाठीच्या कार्याची महती लक्षात घेवून त्यांचा पुतळा परिसराचे आकर्षक पध्दतीने सुशोभीकरण करण्यात यावे व येथे संगमरवरी फलकावर अहिल्यादेवींनी पंढरपूरात केलेल्या कामांची महती वर्णन केली जावी अशी अपेक्षाही यावेळी डि.राज सर्वगोड यांनी व्यक्त केली.तर या निवेदनाची एक पत्र नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांंनाही देण्यात आली आहे.
हे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,संतोष बंडगर,सोपानकाका देशमुख,प्रशांत घोडके,अमित अवघडे,मनोज आदलींगे,संजय मदने,अमित लाडे,आण्णा सलगर,विशाल आर्वे,गोविंद मेटकरी,सोमनाथ ढोणे,संदीप मुटकुळे,महादेव धोत्रे,ओंकार जगताप,आनंद चव्हाण,लखन गांडुळे,सोहन जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com