प्रसिद्ध तेलगू टीव्ही अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या

प्रसिद्ध तेलगू टीव्ही अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या 3 May. 2017 17:27 प्रदीप टीव्ही मालिकांसोबतच रंगभूमीवरही सक्रीय होता
प्रदीप कुमार प्रसिद्ध तेलगू टीव्ही अभिनेता प्रदीप कुमारने बुधवारी सकाळी आत्महत्या केली. हैदराबाद येथील पुप्पलागुदा येथील राहत्या घरी प्रदीपने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. बुधवारी सकाळी सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच प्रदीप टीव्ही अभिनेत्री पवनी रेड्डीशई हिच्याशी विवाह बंधनात अडकला होता. प्रदीप टीव्ही मालिकांसोबतच रंगभूमीवरही सक्रीय होता. त्याचं ‘सप्त मातृका’ हे नाटक फार प्रसिद्ध आहे. प्रदीपची पत्नी अग्नीपोउलू या मालिकेत दिसली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रदीपने आत्महत्येवेळी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली असावी, असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात येतो आहे. पण असे म्हटले जाते की प्रदीपचे घरी भांडण झाले होते. त्यामुळेच त्रस्त होऊन त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तर काहींच्या मते, प्रदीपवर भरपूर कर्ज होते. कर्ज फेडण्याच्या ताणामुळे त्याने आत्महत्या केली. या कारणांची खातरजमा केलेली नाही. प्रदीपच्या कुटुंबियांना जेव्हा त्याच्या आत्महत्येबद्दल कळले तेव्हा ते त्वरीत त्याच्या घरी पोहोचले. याबाबत अधिक माहिती अजून उपलब्ध होऊ शकली नाही.