चारित्र्याच्या संशयावरुन तिसंगीत पतीकडून पत्नीचा खुन

पंढरपूर (प्रतिनिधी):-पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावात एका 45 वर्षाच्या व्यक्तीने आपल्या 42 वर्षीय पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केला.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या  वृत्तानुसार आज दि. 15/6/2016 रोजी दुपारी 2 ते 2:45 वाजणेच्या दरम्यान आरोपी शिवाजी नाथजी भोसले (45) रा.तिसंगी, ता. पंढरपूर याने आपली पत्नी सौ.कमलाबाई शिवाजी भोसले (42) हिच्या चारित्र्यावर संशय घेत ‘‘तू दोन्ही मुलांशी लागु असून त्यांच्या बरोबर तुझे अनैतीक संबंध आहेत. तसेच बाहेरील लोकांशी तुझे अनैतीक संबंध आहेत.’’ अशा प्रकारे बोलत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवु लागला. यानंतर स्व:च्याच राहत्या घरात एका खोलीत त्याने आपल्या पत्नीवर अज्ञात धारदार शस्त्राने हल्ला केला. तिच्या गळ्यावर वार करुन तिला जीवे ठार मारले.
याबाबतची ङ्गिर्याद राजकुमार शिवाजी भोसले (22), व्यवसाय ड्रायव्हर, रा. तिसंगी, ता.पंढरपूर यानी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के. खराडे हे करीत आहेत.