पंढरीत धारदार शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना जामीन मंजुर
पंढरपुर (प्रतिनिधी): पंढरपूर शहरात धारदार शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना शहर पोलिसांनी सतर्कतेने दरोडा टाकण्यापूर्वीच शिताङ्गीने गजाआड केले. याप्रकरणातील 4 आरोपींना जिल्हा सञ न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी दि. 7 जुन 2016 रोजी जामिन मंजूर केला.
6 मे रोजी मध्यराञी वाखरी परिसरातून पंढरीतील दुध पंढरी डेअरीसमोर शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या विशाल गावटे, लक्ष्मण बगले, गजेंद्र कावळे, शैलेश भोसले, प्रशांत गायकवाड या आरोपींना शहर पोलिसांनी लोखंडी कटर, मिरचीपुड, कटावणी, चाकु, कोयता आदि हत्यारासह गजाआड केले होते.
यातील लक्ष्मण बगले, प्रशांत गायकवाड या आरोपींनी अॅड. ओंकार बुरकुल यांचेवतीन जामिन अर्ज दाखल केला होता. अॅड. ओंकार बुरकुल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या पी.आर.देशमुख यांनी पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. तर यातील प्रशांत गावठे या आरोपीने अॅड. गोसावी यांचेवतीने तर शैलेश उर्ङ्ग योगेश भोसले या आरोपीने अॅड. व्ही.डी. बागल यांचेवतीने जामिन अर्ज दाखल केले होते. वरील आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या पी.आर.देशमुख यांनी पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला.