सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोट, मैदर्गी, या नगरपरिषदा हागणदारीमुक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार समारंभ
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ (नागरी) च्या धर्तीवर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर 2015 ते 26 जानेवारी 2016 या कालावधीत राज्यातील 32 नगरपरिषदा व कोल्हापूर महानगरपालिका संपूर्ण हागणदारी मुक्त झाली आहे. तर पाचगणी, वेंगुर्ला व देवळाली प्रवरा नगरपरिषदा संपूर्ण स्वच्छ झाल्या आहेत, अशी माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली.
राज्यात स्वच्छ अभियानाची चळवळ वाढण्यासाठी स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सौ. संगीता नारायण आव्हाडे, वाशीम; सौ. चैताली राठोड, यवतमाळ; सौ. सुवर्णा लोखंडे, सिन्नर या महिलांची स्वच्छता दूत म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नियुक्ती केली आहे.
राज्यातील 265 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 8.31 लाख कुटुंबांना शौचालयाची सुविधा (वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सामुदायीक शौचालय) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस 14 व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध होणाऱ्या निधीमधून किमान 50 % एवढा निधी स्वच्छ भारत अभियानासाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी CSR मधून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष निर्माण करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत शहरांमधील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने ती कुटुंबे उघड्यावर शौचास जातात. अशा कुटुंबाना वैयक्तीक अथवा सामुदायीक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन शहर हागणदारी मुक्त करणे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरात निर्माण होणारा 100 % कचरा निर्मितीच्या जागीच वेगवेगळा (ओला कचरा व सुका कचरा) करून स्वतंत्रपणे संकलीत करणे, या संकलित केलेल्या (ओला व सुका) 100 % कचऱ्याची वाहतूक करणे, ओल्या कचऱ्यावर केंद्रीय अथवा विकेंद्रित पध्दतीने जागीच प्रक्रिया करणे तर सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे व उर्वरित कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विकसीत केलेल्या भरावभूमीवर विल्हेवाट लावून शहर स्वच्छ करणे या दोन बाबींचा समावेश आहे.
या अभियानांतर्गत राज्यात 2 ऑक्टोबर, 2015 पर्यत महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, मलकापूर (नपा), पन्हाळा, मलकापूर (कोल्हापूर), वेंगुर्ला, खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, रोहा, माथेरान, भगूर, मोवाड, कुर्डुवाडी, करमाळा या 19 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व बृन्हमुंबई महानगरपालिकेतील बी व सी हे वार्ड हागणदारी मुक्त झाले आहेत. तर दिनांक 2 ऑक्टोबर, 2015 ते दिनांक 26 जानेवारी, 2016 या कालावधीत चिखलदरा, मुरुड जंजिरा, पेण, कर्जत, राजापूर, मालवण, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुला, मुरगुड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, रहिमतपूर, दुधणी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैदर्गी, सांगोला, शिरपूर-वरवडे, फैजपूर, त्रिंबक, शिर्डी या 32 नगरपरिषदा व कोल्हापूर महानगरपालिका हागणदारी मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर पाचगणी, वेंगुर्ला व देवळाली प्रवरा या
3 नगरपरिषदेची शहरे संपूर्ण स्वच्छ होत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार बुधवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11.30 वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.