छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण न केल्यास छावा उपोषण करणार
निवेदन देताना समाजसेवक सोपान काका देशमुख, शहर संघटक सागर चव्हाण, तालुका संघटक करण कोरके, अमोल तोडके, आसीफ आतार, उमेश रोंगे-पाटील, शुभम भोसले, अविनाश केंदळे, संकेत क्षिरसागर, आकाश माने आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंढरपूर येथील पुतळ्याचे सुशोभिकरण करणेबाबत अ.भा.छावा मराठा युवा विद्यार्थी संघटनच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन देवूनही नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाच्या कामाला मंजूरी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरू केलेले दिसत नाही. तरी दि.12 फेब्रुवारी 2016 पर्यंत पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण न केल्यास अखिल भारतीय छावा मराठा युवा विद्यार्थी संघटनच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरपालिकेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय काळे, जिल्हाध्यक्ष विकी झेंड व तालुकाध्यक्ष अमोल सगर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
छावाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा रंग बदलणे, त्या ठिकाणी 24 तास पाण्याची सोय करणे, साईड ग्रिन तळ करणे, हॅलोजन लाईट कायमस्वरूपी बसविणे, लिफ्टसारखी शिडी बसविणे अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.