अजिंक्य क्रीडा मंडळाचे पुरस्कार जाहीर
पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर 10:-श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अजिंक्य क्रीडा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे देण्यात येणार्या अजिंक्य क्रीडा मंडळाच्या पुरस्काराची घोषणा श्री.प्रणव परिचारक यांनी केली. गेली सात-आठ वर्षापासुन पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील ज्या खेळाडुंनी, संघटकांनी व मार्गदर्शकांनी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. अशा खेळाडुंना, संघटकांना व मार्गदर्शकांना अजिंक्य क्रीडा मंडळाच्या वतीने उत्कृष्ठ खेळाडु, उत्कृष्ठ संघटक आणि उत्कृष्ठ मार्गदर्शक असे पुरस्कार देवुन प्रतिवर्षी गौरविण्यात येते.
यंदाचा उत्कृष्ठ खेळाडु म्हणून पै.समाधान घोडके, रा.बठाण, ता.मंगळवेढा (महाराष्ट्र केसरी) यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या आजोबाकडुन त्यांनी कुस्तीचे बाळकडू घेतले असून त्यांनी अनेक कुस्तीचे आखाडे
गाजविले आहेत. पुणे केसरी, लातूर केसरी, वाशीम केसरी, कर्नाटक केसरी आणि महाराष्ट्र केसरी असे अनेक मैदाने त्यांनी गाजविली आहेत. अशा या मल्लास अजिंक्य क्रीडा मंडळाकडुन उत्कृष्ठ खेळाडु म्हणून गौरविण्यात येणार तसेच यंदाच्या उत्कृष्ठ मार्गदर्शक म्हणून श्री.हणुमंत जगन्नाथ फाटे (गादेगांव) यांना देण्यात येणार आहे. श्री.फाटे हे गेली 35 वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक जिल्हा व राज्यस्तरीय खो-खो व कबड्डी चे अनेक खेळाडु तयार केले आहेत. अशा या अष्टपैलू क्रीडा शिक्षकाचा गौरव उत्कृष्ठ मार्गदर्शक म्हणून करण्यात येणार आहे.
तसेच यंदाच्या उत्कृष्ठ संघटक हा पुरस्कार पंढरपूर येथील व्यापारी कमिटी, पंढरपूर या स्वातंत्र्यपुर्व स्थापन
झालेल्या संस्थेस देण्यात येणार आहे. गेल्या 138 वर्षापासुन व्यापार कमिटी अवितरतपणे कुस्ती आखाड्याने आयोजन करत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक कुस्तीपटु या आखाड्यात मैदान गाजवून गेले आहेत. तसेच अनेक कुस्तीपटुंना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. अशा या संस्थेस या वर्षाचा उत्कृष्ठ संघटक पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराचे वितरण समारंभ दि.15 मे 2015 रोजी सायं.5.00 वाजता अजिंक्य क्रीडा मंडळ, टिळक स्मारक प्रांगण, पंढरपूर येथे श्री.भावेश भाटीया, महाबळेश्वर(सातारा) राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांच्या शुभहस्ते देण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पांडुरंग कारखान्याचे चेअरमन श्री.सुधाकरपंत परिचारक हे असणार आहेत. सदर पुरस्काराची निवड सर्वश्री प्रा.सुभाष मस्के सर, रा.पा.कटेकर, मोहन यादव, संजय अभ्यंकर, गजेंद्र पवार सर, अभय
जोशी, कैलास खुळे सर, नितीन कांबळे सर, यांच्या निवड समितीने केली आहे. याप्रसंगी गत 15 दिवसापासुन सुरू असणार्या उन्हाळी शिबीराची सांगता होणार असून यावेळी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून दाखविली जाणार आहेत. तरी अशा या समारोप सोहळ्यास तमाम पंढरपूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजिंक्य क्रीडा मंडळाच्या वतीने करणेत आले आहे.