पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल होत असतात.या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास नातेवाईकांना रक्तपेढीकडे धाव घ्यावी लागते.मात्र मात्र यावेळी पंढरीतील बजाज रक्तपेढीकडुन राखीव शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम आकारली जात असुन त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दुदैवी चित्र पंढरपूरात दिसुन येत आहे.
याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे संस्थापक व उपजिल्हा रुग्णालय सल्लागार समितीचे सदस्य डि.राज सर्वोगड यांनी बजाज रक्तपेढीच्या व्यवस्थापनासह राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे केली आहे.याबाबत अधिक माहीती देताना ते म्हणाले की,बजाज रक्तपेढीकडुन रक्ताच्या एका पिशवीसाठी 1250 रुपये शुल्क आकारणी केली जाते.व अतिरिक्त पिशवीचे राखीव शुल्क म्हणुन 650 रुपये घेतले जातात.त्यामुळे रुग्णास एका पिशवीमागे विनाकारण 650 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्या रक्तपेढीकडुन अशा प्रकारे जादा शुल्क आकारणे गैर असुन सोलापूर जिल्ह्यात इतर रक्तपेढ्यंाकडुन राखीव शुल्कापोटी केवळ 150 रुपये आकराले जात असल्याचेही त्यांनी सांगीतले.सदर तक्रारीनंतर रक्तपेढीच्या व्यवस्थापनाने लेखी खुलासा दिला असुन 650 ऐवजी 400 रुपये राखीव शुल्क आकारण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.मात्र रक्ताची मागणी लक्षात घेता राखीव शुल्क इतर रक्तपेढ्यांप्रमाने 150 रुपये आकारावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या बाबत रक्तपेढीच्या व्यवस्थापनाची भुमिका अडवणुक करणारी असुन राखीव शुल्क त्वरीत कमी करा वरिष्ठ पातळीवर दाद मागण्यासह आंदोलन करावे लागेल असा इशारा डि.राज सर्वोगड यांनी दिला आहे.