सरगम चौकात वारंवार होते ट्रॅफिक जाम...! काय आहेत याची कारणं..?

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर शहरातील सरगम चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. येथील प्रमुख चौक. पुणे, टेंभुर्णी , पंढरपूर शहरात जाण्यासाठी हा महत्वाचा चौक. मात्र या चौकात वाहतुक पोलिसांची अनुपस्थिती असलेने वाहतुकीला शिस्त नसते. यामुळे पंढरीतील नागरिकांचा वयोवृध्द प्रवाशांचा, आजारी रुग्णांचा, विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत आहे. 

के.बी.पी. कॉलेज, कवठेकर प्रशाला तसेच शेळवे येथील कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज आदी महाविद्यालयाकडे  जाणारे विद्यार्थी तसेच पंढरपूर शहरात उपनगरातील येणारे नागरिक याच चौकातून प्रवास करतात. मात्र  के.बी.पी. चौक येथे बाह्य वळण रस्ता असतानाही  वहातुक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सरगम चौकातूनच अवजड वाहनांचा राबता असतो. तसेच पांडुरंग साखर कारखाना, सहकारशिरोमणी साखर कारखाना, श्रीविठ्ठल साखर कारखाना तसेच करकंब मधील विजय शुगर्स आदी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर्स याच चौकातून ये-जा करत असतात. याचबरोबर या चौकात कांही व्यावसायीकांनी रस्त्यावरचे केलेले अतिक्रमण ही येथील वाहतुकीला अडथळा बनलेले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे येथे वारंवार होणारे ट्रॅफिक जाम आहे.

सरगम चौकानजीकच डॉ. शितल शहा यांचा लहान मुलांचा दवाखाना आहे, नजीकच श्री विठ्ठल हॉिस्पिटल आहे, इतर ही कांही दवाखाने आहेत. यामुळे या चौकातून अनेक अत्यवस्थ रुग्णांना घेवून जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्स ना सुध्दा येथील वाहतुकीच्या बेशिस्तपणामुळे चौकात थांबावे लागते. याच बरोबर येथे एचडीएफसी बँक  व इतर वित्तीय संस्था आहेत. नागरिकांना आपली कामे  चौकातील वाहतुकीच्या कोंडीमुळे वेलेत न झाल्याने आर्थिक,  शारिरीक व मानसिक झळ बसत आहे. तसेच सरगम चौकातूनच मेकॅनिकल चौकाकडे जावे लागते. नविन सोलापूर रोडवर व या चौकात विविध वाहनांच्या दुरुस्तीची गॅरेज आहेत. यासाठी या मार्गावर अनेक वाहनधारक आपल्या नादुरुस्त वाहनांची ने-आण करत असतात. यावेळी नादुरुस्त वाहनांमुळे कांही वेळा छोटे-मोठे अपघात होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला पहावयास मिळत आहे.

या चौकात अगोदरच नागरिकांसाठी डोकेदुखी बनुन राहिलेला रेेल्वेचा पुल आहे. या पुलाखाली कायम वाहतुकीची कोंडी झालेली असते. पावसाळ्यात तर या पुलाखाली पाणी साठून राहिल्याने सरगम चौकात वाहनधारकांचे होणारे हाल नित्याचेच आहेत. यातच भर म्हणजे सरगम चौकातील वाहतुकीला शिस्त लावणारे आपल्या कर्तव्यात दिरंगाई करत असल्याने येथे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे पंढरीतील नागरिकांचा वयोवृध्द प्रवाशांचा, आजारी रुग्णांचा, विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत असून याकडे पंढरपूर शहर वाहतुक पोलिस शाखेने त्वरीत लक्ष देवून नागरिकांना दिलासा द्यावा. एवढेच.

*******

पंढरपूर लाईव्ह च्या वाचकांनी फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त केलेल्या यावरील खालील प्रतिक्रिया बघा... 



  • Masuraj Raut Sargm Chokat Trapik Polis Thevle Pahije
    Unlike · Reply · 2 · 21 hrs
  • Pramod Kulkarni Aajun bhrpur thikani aast aasch
  • Pramod Kulkarni Pramukhyane sangola chaok
  • Ganesh Hegde · Friends with Mahavir Gandhi and 14 others
    योग्य विषय आणि जागा निवडली

    • ********************************************************

     


    पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

    अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

    आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
    आज दि. 9-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 96 हजार 869 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
    मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 806 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
    ‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
    पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

    आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

    आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
    मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

    मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399