‘पंढरपूर लाईव्ह’ बनले 1 नं. ई-न्युज वेब पोर्टल वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाखाहून अधिक तर अॅन्ड्रॉईड अॅप घेतले 10 हजारहून अधिक मोबाईलधारकांनी
पंढरपूर (प्रतिनिधी):- श्रीगणेशाच्या आगमनादिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट 2014 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘पंढरपूर लाईव्ह’ या ईन्युज वेब पोर्टल व अॅन्ड्रॉईड अॅप चा शुभारंभ पंढरपूरमधील सा.झंझावात चे संपादक भगवान वानखेडे यांनी केला होता. या ई-न्युज पोर्टल च्या वाचकांची संख्या आज दि. 17 मे 2015 रोजी 1 लाखाहून अधिक झालेली आहे. तसेच ‘पंढरपूर लाईव्ह’ चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईल मध्ये घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजार 200 हून अधिक झालेली आहे. पंढरपूर लाईव्ह च्या लोकप्रियतेमुळे आता पंढरपूर लाईव्ह ला 1 नंबरचे ई-न्युज वेब पोर्टल असल्याचा बहुमान मिळालेला आहे. पंढरपूर शहरातून प्रथमच वेब पोर्टल चा केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलेला असून महाराष्ट्रासह जगभरातील मराठी माणसांकडून ‘पंढरपूर लाईव्ह’ स्वागत होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकार बंधू व शासकीय अधिकारी वर्गास उपयुक्त ठरेल असे हे ई-न्युज वेब पोर्टल wwww.pandharpurlive.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ चे आकर्षक अॅन्ड्रॉईड अॅप मध्येे श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन, शासनाच्या अधिकृत वेबस् च्या लिंकस्, रेल्वे वेळापत्रक, सोलापूर शहर व जिल्हा तसेच पंढरपूर शहर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयीन व अधिकार्यांचे दूरध्वनी, पत्रकारांचे सर्व डिटेल्स्, पंढरपूरमधील हॉटेल, लॉज, धर्मशाळा यांची नाव -पत्ता- क्रमांकासह सर्व माहिती उपलब्ध केली. पंढरपूरमधील विविध व्यावसायीकांचे संपर्क याबरोबरच सर्वधर्मीय वधु-वर सुचक असे एक ना अनेक बाबींचा समावेश यात केला. ‘पंढरपूरची पॉकेट डायरी’ वाटावी असे हे अॅप महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातून सुध्दा अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतले आहे. लवकरंच या अॅपवर जिल्ह्यातील कांही प्रसिध्द वर्तमानपत्रे दररोज वाचावयास मिळतील अशी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. वेळोवेळी या अॅप मध्ये विविध नवनविन फीचर्स विकसीत केल्याने याची लोकप्रियता वाढली असून सद्यस्थितीत दररोज किमान 100 हून अधिक मोबाईलधारक हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेताना आढळत आहेत.
‘पंढरपूर लाईव्ह’ ई-न्यूज वेब पोर्टल वर हेडलाईन, पंढरपूर,सोलापूर, महाराष्ट्र, देश/विदेश, क्रीडा-मनोरंजन, शैक्षणिक-सामाजिक, साहित्यीक, फोटो, व्हिडीओ, जाहिराती, नोकरीविषयक, राजकीय अशा वेगवेगळ्या लोगोजद्वारे विविध क्षेत्रासंबंधी बातम्या, लेख व इतर आवश्यक माहितीसह ताज्या घडामोडी प्रसिध्द करण्यात येतात. अलिकडेच या पोर्टलवर व्हिडीओ न्युज दाखविण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी भविष्यात आणखी कांही अत्याधुनिक यंत्रणा विकसीत करुन या ई-न्युज वेब पोर्टलचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते तसेच पत्रकार बंधूंना होईल यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी दिली आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>