पंढरपूर जुन्या बसस्थानकामागे मिळाले दोन दिवसाचे नवजात बालक

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)

पंढरपूर मधील जन्या बसस्थानकाच्या मागे रेल्वे रुळानजीक असलेल्या कच्च्या रस्त्यावर दोन दिवसाचे नवजात बालक मिळाले असून कुणीतरी अज्ञात इसमाने हे बालक सोडल्याची शक्यता पंढरपूर शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाग 5 मधील या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात गुरनं. 65/15, भादवि 317 प्रमाणे दि. 21/4/2015 रोजी केली असून दनि दिवसाच्या या नवजात मुलाला एका लाल रंगाच्या ओढणीमध्ये गुंडाळून सोडलेले आहे. त्याचे डोक्यावर काळ्या गुलाबी रंाचे टोपडे, हिरव्या रंगाचे झबले, एक पिवळ्या रंगाचे दुपटे व त्यावर इंग्रजीत CANON  असे लिहीलेले आहे.
वरील वर्णनाचे नवजात बालक हरवल्याची तक्रार असल्यास संबंधीतांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फोन नं. 02186- 223445 वर संपर्क साधावा अशी विनंती शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे.  
अशी माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.आर. बल्लाळ यांनी दि. 23 एप्रिल 2015 रोजी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
************************





पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 23 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 85 हजार 786 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 206  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399