तावशी गाव झाले चकाचक.. तावशीमध्ये बी. फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेची मोहीम संपन्न

पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019






 पंढरपूर- तावशी (ता. पंढरपुर) मध्ये स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विध्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजने (रा स यो) अंतर्गतआठवडाभर मोहीम संपन्न झाली. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, स्वच्छता मोहीम, प्रबोधनपर अशा अनेक उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे उदघाटन तावशीचे सरपंच सौ. सोनाली यादव यांनी केले तर समारोपाचे पाहुणे म्हणून स्वेरीचे विश्वस्त सुरज रोंगे उपस्थित होते. 

सोलापूर विद्यापीठ सोलापूर व स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी गोपाळपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेले हे उपक्रम तब्बल आठवडाभर चालले. यामध्ये विशेष परिश्रमग्रामस्थांना शैक्षणिक प्रबोधनग्राम स्वछतेचे महत्वमुली वाचवा देश वाचवावृक्षारोपणपाणी वाचवाजिल्हा परिषदेतील लहान मुलांना शिक्षणाचे महत्व व मार्गदर्शन, वेळोवेळी उपचाराचे महत्व, आरोग्याची काळजी असे अनेक प्रबोधनपर  व संस्कारात्मक स्वरूपाचे शिबीर आयोजित केले होते. स्वेरी फार्मसीचे रासयोचे यूनिट  स्थापनेपासून विविध गावांमधे उपक्रम राबवून नागरिकांना स्वच्छतेतून सम्रद्धीकडे घेऊन जाताना समाजसेवेचे काम आविरत करत आहेत. 'माझ्यासाठी नव्हेतुमच्यासाठीया रासयोच्या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करत तावशी गावामध्ये स्वच्छतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. या योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे  १३० विद्यार्थ्यांचे  व साधना विद्यालय तावशी येथे १५० विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले, वजन व उंची मोजण्यात आली व तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व व मार्गदर्शन असे अनेक प्रबोधनपर व संस्कारात्मक स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात आले. तसेच तावशी गावातील ४५० पेक्षा जास्त घरांची भेट घेऊन त्यांच्या आजारांवरील अहवाल तयार करण्यात आला व ग्रामस्थांना त्या आजारासाठी घ्यावयाच्या काळजी बद्दल चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली. 




याचबरोबर गावामध्ये ‘लग्नानंतरच्या सप्तपदीनंतर नौकरीतील तप्तपदी’ हे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली व विशेष कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांची रक्तदाब तपासणीचे शिबीर घेण्यात आले. सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे विश्वस्त सुरज रोंगे उपस्थित होते. यावेळी ग्रामसेविका ज्योती पाटील व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करून पुढील तीन वर्षे देखील या राष्ट्रीय सेवा योजनेचे आयोजन तावशी गावामध्येच करण्यासाठी आवाहन केले. या मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमात तावशी ग्रामस्थांनी देखील उत्कृष्ठ सहकार्य केले. दरम्यान विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था देखील तावशी ग्रामपंचायती तर्फे करण्यात आली होती.  यावेळी तावशीचे सरपंच सौ. सोनाली यादव, जेष्ठ नागरिक वि. का. स. से. सोसायटीचे चेअरमन सरकार यादवभुजंग यादवमिलिंद यादवग्रामविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील,साधना विद्यालयाचे सचिव बाळूकाका यादव,मुख्याध्यापक अनुसे, उपसरपंच अल्लाभाई मुलाणीधनाजी यादवपोलीस पाटीलकबीर आसबेस्वेरी कॉलेज फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. डी. सोनवणेउपप्राचार्य डॉ. अमित गंगवालतसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथुन मनियार, प्रा.एच. बी. बनसोडेप्रा.वी. डी. चिपडेप्रा.बी.एस.अंकलगीप्रा.एल. एन. पाटील,डॉ. आर. डी. बेंदगुडे, प्रा. एस. आर. माने, प्रा. एम. जे. खांडेकररासयो सचिव राहुल जाधव,प्रा.  कार्यक्रम समन्वयक संदीप यादवविद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com