चळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र असुन अडचन नसुन खोळंबा...

पंढरपूर LIVE 29 जानेवारी 2019

पंढरपूर .(प्रतानिधी) पंढरपूर तालुक्यातील चळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे सर्वर डाऊन आहे म्हणुन बँक सभासदांना दिवसेंदिवस पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आसुन गेली सहा महिण्यापासुन ही समस्या कायम असुन देखील या बँकेचे मॅनेजर जाणुन-बुजुन केवळ सभासादांना नाहक ञास देत असल्याची खंत चळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.




ही बँक चळे, आंबे, सरकोली, रांझणी या चार गावासाठी असुन या गावच्या शाळेतील शिक्षक पगार, शेतकरी व शेत मजुर यांच्या दुधाची पगार तसेच अनेक व्यवहार या शाखेतुन होत असुन सर्वर डाऊन असल्याचे सांगीतल्यामुळे ही बँक असुन अडचण व नसुन खोळंबा अशीच अवस्था झाली आहे.

या बँकेतील व्यवहार येत्या दोन ते चार दिवसात सुरळित न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा बँक सभासदांनी दिला आहे.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com