पंढरपूर येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा...

पंढरपूर LIVE 21 जानेवारी 2019


प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुकादेवी हिची पूजा केली जाते.
पंढरपूर (संत पेठ) येथील सौ. स्वाती सुरेश माने-देशमुख याच्या येथे घरी  श्री दुर्गामाता शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आल. यानिमित्ताने गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच या काळात प्रसाद भोजनाचा  लाभ भाविकांना घेता  आला. सौ. स्वातीताई याच्या स्वप्नात देवीने दृष्टात देवून देवी त्याच्या भक्ति साठी त्याच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थिर झालेली आहे. 






आनेक वर्षांपूर्वी पासून  दुर्गामाता शाकंभरी पौर्णिमा उत्सव  येथे करण्यात येतो. याही वर्षी दरवर्षी प्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला आहे. उत्सव काळात देवीला आनेक रूपात सजवले जाते.  तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते आनेक भाविक देवीचे दर्शन घेतात. महाप्रसाद तसेच देवीच्या गाण्याचा कार्यक्रम घेवून या उत्सवाची सांगता केली जाते.  ह्या दिवशी आनेक प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकत्रित भाजी करण्यात येते. यासाठी विविध प्रकारच्या भाज्या, रानभाज्या, कंदमुळे जमा करून आणतात. यात अनेक दुर्मिळ भाज्यांचा समावेश असतो. ह्या तयार केलेल्या भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आनेक भाविक दरवर्षी येत असतात. शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव पंढरपूर मध्ये  प्रसिद्ध झाला असून तालुक्यातून आनेक भाविक हया उत्सवाला हजेरी लावतात. या  उत्सवाचे आयोजन हे सौ. स्वातीताई सुरेश माने-देशमुख या करतात तसेच देवीच्या सजवटीचे काम विवेक माने-देशमुख हे करतात.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com