पंढरपूर तालुक्यातील आढीव शिवारात विहीरीत पडून दोन काळवीटांचा मृत्यु

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019                

   
पंढरपूर तालुक्यातील आढीव शिवारात विहीरीत पडल्याने दोन काळविटांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दि. 31 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडल्याचे समजते. याबाबत पंढरपूर लाईव्हला समजलेल्या माहितीनुसार बाळासाहेब रामचंद्र खाडे, रा. आढीव, ता. पंढरपूर यांच्या शेतातील विहीरमध्ये हे काळवीट बुडून मृत्यु पावले. 
      



पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावर आढीव व बाभुळगावच्या शिवेवर आढीवकडून बाभुळगावकडे जाताना रस्त्याच्या उजवीकडे 250 फुट अंतरावर खाडे यांची पडीक जमीन आहे. त्यामध्ये असलेल्या या विहिरीला कठडे नाहीत. रात्रीच्या वेळी मेंढापूर भागातील वनक्षेत्रातील ही काळविटे आढीव भागात आली असावीत व या विहिरीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यु झाला. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. सदर काळविटांची उत्तरीय तपासणी घटनास्थळीच डॉक्टरांनी केली आहे.



या काळविटांचे वयोमान सव्वा तीन ते साडे तीन वर्षे एवढे आहे. या तपासणीत सदर काळविटांना कोणत्याही प्रकारचीॅ विषबाधा झाली नसल्याचे व शरिरावर कोणत्याही जखमा नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहितीही वनअधिकार्‍यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.  






       



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com