इसबावी येथील श्रीराम मंदिरासमोरील सभामंडपाचे व हायमॉस्ट लॅम्पचे आ.भारत भालके यांचे शुभहस्ते लोकार्पण
पंढरपूर LIVE 22 जानेवारी 2019
पंढरपूर शहरातील इसबावी येथील श्रीराम मंदिरासमोरील सभामंडपाचे व हायमॉस्ट लॅम्पचे लोकार्पण सोहळा सोमवार दि.21.01.2019 रोजी सायं.06.30 वाजता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुभहस्ते व श्रीराम सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अरूण मलपे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदरचे विकास काम हे आमदार भारत भालके यांचे आमदार फंडातून साकारलेले आहे. सदरवेळी आमदार श्री. भालके म्हणाले की, इसबावीचा विकास करणेसाठी व नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे.
सदरवेळी श्रीराम सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मलपे, सचिव सुखदेव शिंदे, उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे व संचालक मंडळ, सभासद, नगरसेवक प्रशांत शिंदे, डी.राज सर्वगोड, माजी नगरसेवक बालाजी मलपे, बाळासाहेब नेहतराव तसेच सतीशआप्पा शिंदे, सिकंदर ढवळे सर, प्रमोद शिंदे, पै.भिमराव माळी, राजाभाऊ भोसले यांचेसह पंचक्रोशितील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




