ओढ तुळशी वृंदावनाची...

पंढरपूर LIVE 22 जानेवारी 2019

 
फोटो- प्रसाद हरिदास, माझाक्लिक ..तुलशीवन_पंढरपूर_येथील_भव्य_दिव्य_श्री_विठ्ठलाची_मुर्ती



- एकनाथ पोवार, (माहिती सहायक, सोलापूर)

विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन येणार्‍या वारकरी भाविकास पंढपुरात काही वेळ पर्यटनाचा आनंद लुटता  यावा  यासाठी  पांडूरंगाला आवडणारी तुळस आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारे तुळसीचे महत्व लक्षात घेवून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पंढरपूरात यमाई तलावाशेजारी तुळशी वन विकसित केले आहे.  तुळशीवनाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, 25 जानेवारी 2019 रोजी होत आहे, त्यानिमित्ताने.....





भक्त पुंडलिकाची नगरी, वारकर्‍याचे माहेर’ असलेल्या पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात.. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला महत्व आहे.  वारकरी  विठ्ठलाला तुळसीहार अर्पण करून नतमस्तक होतो. वारकरी आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यास सुरवात केली. यामध्ये पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करण्याबरोबरच शहरातील अंतर्गत रस्ते बनविण्यास प्राधान्य दिले. पंढरपुरात येणार्‍या वारकरी भाविक व पर्यटकास सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पंढपुरात विकसित करण्यात आलेले यमाई तलावाशेजारी तुळशीवन वारकरी, भाविक, पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे.


तुळशी वनाची रचना श्रीयंत्रावर आधारित आहे.  श्रीयंत्राची प्रतिकृती तुळशी उद्यानामध्ये साकारण्यात आलेली आहे. श्रीयंत्राच्या मध्यभागी स्वयंचलित रंगीत कारंजे बसवण्यात आले आहेत. सायंकाळीच्या वेळी विद्युतरोषणाईमध्ये पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.  श्रीयंत्राच्या त्रिकोणामध्ये सदाफुली, गुलाब, मोगरा विविध रंगाच्या शेवंती इत्यादी शोभिवंत फुलझाडाची लागवड करण्यात आली आहे.  तर बकुळ, पारिजातक, सोनचाफा, चाफा, पिवळा बांबू, पाम या वृक्षांची लागवड तसेच तुळशीवनात आठ प्रजातींच्या तुळशी रोपांची लागवड करण्यात आली आहे.


तुळसी वनात मध्यभागी कारंजे असून त्याच्या भोवती चारी बाजूनी  एकात एक गुंफलेले नऊ त्रिकोण असून  नऊ त्रिकोण नऊ शक्तीचे प्रतिक आहेत. त्रिकोणांच्या मध्यभागी  संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत सावता माळी, संत कान्होपात्रा आणि संत चोखामेळा यांच्या मुर्ती आहेत.


तुळसीवनाच्या पूर्व दिशेला विठ्ठलाची 24 फुटी भव्य मूर्ती चबुतर्‍यावर आहे. विठ्ठल मूर्ती तुळसीवनाचे आर्कषण केंद्र आहे. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर खुले सभागृह उभारले असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला गोपुरे बांधली  आहेत.

तुळशीवनास भेट देणार्‍या पर्यटकांना वन्यजीवांची माहिती व आवड निर्माण होण्यासाठी वाघ, गवा, मोरपक्षी, पोपट, हरीण, फुलपाखरे यांची चित्रे काढण्यात आलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूला सह्याद्री पर्वतरांग चित्रीत केलेली आहे व उजव्या बाजूला जगप्रसिध्द कासपठाराचे चित्र रेखाटण्यात आले आहे. यामुळे  तुळशी वृंदावन, भाविक, पर्यटकांचे आकर्षण बनणार आहे.




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com