स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर येथे अपंगत्व (दिव्यांग) निवारण तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर...

पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019

शस्त्रकीया शिबिराचे आयोजन, लंडनचे तज्ञ डॉक्टर्स करणार शस्त्रक्रिया.
स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे रोटरी क्लब कॉव्हेन्ट्री लंडन, अंबरनाथ, देवनार व श्री प्रशांतराव परिचारक फौंडेशन पंढरपूर यांच्या सहकार्याने विनामूल्य अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया शिबिर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिनांक २६ व २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मागील ९ वर्षापासून शिबिरामध्ये ७०० च्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

यावर्षी जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.  सदरील शिबिरामध्ये पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सदरील तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. सदरील शिबिरामध्ये लंडन येथील प्रसिद्ध अस्थीव्यंगोपचार तज्ञ डॉ जॉन क्लेग व इतर  ६ तज्ञ डॉक्टर्स व मुंबई येथील डॉ मयुरेश वारके, डॉ प्रमोद काळे अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. 
श्री. प्रशांतराव परिचारक सोशल फौंडेशन, पंढरपूर, रोटरी क्लब, अंबरनाथ, देवनार, कॉव्हेन्ट्री (लंडन) आणि स्पर्श ग्रामीण रूग्णालयातर्फे डॉ. जॉय पाटणकर यांच्या स्मृत्यर्थ उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यातील ० ते १४ वयोगटातील मुलांसाठी हे शिवीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्या करिता येणार्या विद्यार्थ्यांनी दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी उपाशीपोटी यावे. सर्वशिक्षा अभियातर्गत उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातील शाळा तपासणीत आढळून आलेल्या सर्व अपंग विद्यार्थ्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. परिसरातील अपंग शाळातील मुलांचीहि तपासणी केली जाणार आहे. 
सादर शिबिरामध्ये टे‌‍डन लेदनिग, आथौडेसिक सीटीडव्ही करेक्शन आदी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय, परिचारक सोशल फौंडेशन, सास्तूर येथील निवासी अपंग शाळेने पुढाकार घेतला आहे. 




पोलिओ निर्मुलनासाठी सध्या देशभरात मोठी काळजी घेतली जात आहे. ज्यांनी पूर्वीच पोलिओ झाले आहे. अन्य कारणामुळे अपगत्व आले आहे. अशा मुलांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊनच शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराचे हे नवे वर्ष आहे.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन अपंग शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करावे असे आवाहन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी श्री. आर.बी.जोशी यांनी केले आहे.
contact..Rahul patwardhan.98819 39010





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com