पंढरपूर सिंहगडच्या सौरभ मोहोळकरने दुस-यांदा सुवर्णपदकाचा मानकरी

पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019


   पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला सौरभ प्रसन्न मोहोळकर या विद्यार्थ्यांने आंतरराष्ट्रीय  स्टुंडंट ऑलिम्पिक खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले, असून सलग दुस-यांदा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    
"स्टुंडंट ऑलिम्पिक असोसिएशन” आयोजित १८ ते २१ जानेवारी २०१९  या कालवधीत मलेशियात येथे आयोजित करण्यात आलेल्या स्टुंडंट ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन खेळामध्ये सौरभ प्रसन्न मोहोळकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील खेळाडूसाठी "स्टुंडंट ऑलिम्पिक असोसिएशन” यांच्या वतीने बॅडमिंटनच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सौरभ प्रसन्न मोहोळकर यांनी विविध राज्यातून आलेल्या ७०० हुन अधिक स्पर्धकामधून २५ वर्षे वयोगटातील सिंगलस व डब्बलस मध्ये राष्ट्रीय कामगिरी करून सुवर्णपदक मिळविले आहे.
       



स्टुंडंट ऑलिम्पिक राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन खेळामध्ये भारतातील १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.  त्यापैकी १२ विद्यार्थी हे विविध वयोगटातील बॅडमिंटन खेळासाठी होते. यापूर्वी सौरभ प्रसन्न मोहोळकर यांनी विविध देशातून आलेल्या ६०० हुन अधिक स्पर्धकामधून २२ वर्षे वयोगटातील दुहेरी मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी करून गोल्ड मेडल व ब्राँझ मेडल (कांस्यपदक) मिळविले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सर्वाधिक गोल्ड मेडल मिळवून कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल वडील प्रसन्न नारायण मोहोळकरआई माधवी प्रसन्न मोहोळकरबॅडमिंटन खेळाचे शिक्षक प्रा. तुषार मुळेप्राचार्य डॉ. कैलाश करांडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com