वृद्धाश्रम कमी करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची- अर्जुनसिंह मोहिते पाटील

पंढरपूर LIVE 22 जानेवारी 2019


पंढरपूर: दि. “ विद्यार्थ्यांनी समाजाची आणि कुटुंबाची नैतिक जबाबदारी घेऊन जीवन जगले आवश्यक आहे. आज देशामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढले आहे, ते कमी करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. तरुणांनी राजकारणाकडे सकारात्मक भूमिकेने सहभागी घेऊन, समाजात सकारात्मक बदल घडविले पाहिजेत.  विद्यार्थ्यातील कलागुणांना, नेतृत्वगुणांना एन. एस. एस. शिबीरातून संधी मिळते. विद्यार्थ्यामधील संघटन शक्ती बळकट होण्याचे एन. एस. एस. शिबीर हे एक प्रभावी माध्यम आहे. नेतृत्व, समता, एकता, आणि मानवी मुल्यांची रुजवणूक शिबिरातून होत असते.” असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी केले.




पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे मेंढापूर येथे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. जनरल बॉडी सदस्य राजाबापू पाटील होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘स्वावलंबी जीवन जगण्याचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत दिले जातात. ग्रामीण भागाची स्वच्छता, समाज प्रबोधन आणि जनजागृती केली जाते. एन. एस. एस. शिबीरातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर जाणीव जागृती करून सकारात्मक काम करता येते. खेड्यांचा कायापालट करण्याची क्षमता तरुण स्वयंसेवकांमध्ये आहे. असे मत
त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर सहकार शिरोमणी साखर कारखाना भाळवणीचे चेअरमन कल्याणराव काळे, वसंतनाना देशमुख, आर,डी. पवार, राजेंद्र पाटील, सौ. अर्चना विष्णू पाटोळे, दिलीप कोरके, सचिन शिंदे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने,
राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ. एस. पी. शिंदे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ एफ. एस. बीजापुरे, एन. एस. एस. च्या सोलापूर विद्यापीठ विभागीय समन्वयक डॉ. चंद्रकांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. जी. बी. भगत, डॉ. बी. एम. सुळे, डॉ. ए. एल. शेख, डॉ. एस. बी. इंगवले, प्रा. डी. डी. हाके, कु. सारिका भांगे प्रा. कु. अलका घोडके, प्रा. सुहास शिंदे. श्री. गणेश फुलारे , श्री विकास कांबळे, श्री. संजय मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. एस. पी. शिंदे यांनी तर सूत्रसंचालन कु. अलका घोडके यांनी केले. आभार दिलीप कोरके यांनी मानले. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व एन. एस. एस. स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com