श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे प्रा.संतोष साळुंखे यांना पी.एच.डी. प्राप्त
पंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.संतोष भारत साळुंखे यांना आय.आय.टी. बॉम्बे (इंडीयन इन्स्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे) मधून अभियांत्रिकीमधील ‘व्हेरिएशनल असीमटोटिक मॉडेलिंग ऑफ थिन प्रीट्वीस्टेड अँन्ड ड्यामेजड कम्पोजीट स्ट्रीप्स’या विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध आय.आय.टी. बॉम्बेमध्ये सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी पी.एचडी. प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
डॉ. पी.जे गुरुप्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. साळुंखे यांनी पी.एचडी. पूर्ण केली. त्यांना आई, वडील, भावंडे, पत्नी सौ. करिष्मा साळुंखे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, इतर प्राद्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. साळुंखे यांनी आवर्जून सांगितले. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या उपस्थित होत्या. ‘डॉ. साळुंखे हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या ११ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर डेन्मार्क व इटलीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय काम्पोझीट स्ट्रक्चर परिषदेमध्ये पेपर सादर केले होते, तसेच सहा पेपर नामवंत संस्थेमध्ये सादर केले.

दोन आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून शोध प्रबंध प्रकाशित झाली आहेत. पीएचडी प्राप्त केल्यामुळे यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह इतर स्वेरीचे पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, यांच्यासह उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. साळुंखे यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




