गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या अंतरविद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवात प्रा.सुभाष जाधव आणि आणि संजय मिटकरी यांच्या शोध निबंधांना प्रथम क्रमांक

पंढरपूर LIVE 21 जानेवारी 2019




पी.पी.जी. विभागात दोघांनीही मिळविला प्रथम क्रमांक
पंढरपूर- गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे झालेल्या महोत्सव’अविष्कार २०१८’ या आंतर विद्यापीठ स्तरीय संशोधन सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने सहभागी झालेले स्वेरीचे प्रा.सुभाष व्यंकटराव जाधव आणि आणि संजय गुरुसिद्धप्पा मिटकरी यांच्या शोध निबंधास प्रथम पारितोशिकाने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सोलापूर विद्यापीठातर्फे स्वेरीत आयोजिलेल्या ‘अविष्कार २०१८’ या विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवात देखील दोघांनी पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी (पी.पी.जी.) विभागात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे त्यांची निवड आंतर विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सवातील स्पर्धेत झाली होती.



गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सवात  पदव्युत्तर पदवी विभागातून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा.सुभाष जाधव यांनी ‘अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण’ विभागातून ‘अॅनालिसिस ऑफ मायक्रो चॅनेल हिट सिंक फॉर इलेक्ट्रॉनिक कुलिंग अॅप्लिकेशन’ या विषयावर सादर केलेल्या शोध निबंधाला तसेच स्वेरीमधीलच पी.एच.डी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी संजय मिटकरी यांनी ‘कृषी व पशुसंवर्धन’ विभागामधून ‘एक्स्प्रीमेंटल स्टडी ऑफ अॅप्लिकेशन ऑफ वेपर अॅबसॉर्पशन रेफ्रिजरेशन सिस्टम (व्ही.ए.आर.एस.) एन डेरी मिल्क इंडस्ट्रीज’ या विषयावर सादर केलेल्या शोध निबंधास प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळाला आहे.  दोघांनाही प्रमुख पाहुणे अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. व्ही.एम भाले यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषक देवून गौरविण्यात आले. प्रा. सुभाष जाधव आणि आणि संजय मिटकरी यांना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

आंतर विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सवात यशस्वी झाल्यामुळे प्रा.सुभाष जाधव आणि आणि संजय मिटकरी यांचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी.नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त तसेच संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ,डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com