बुद्धीबळ स्पर्धेत रोहित बागवाले, शोभराज उत्पात, रघुनंदन तरंगे व समर्थ घोडके प्रथम

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019

                                  
स्वेरीतील नियोजन कौतुकास्पद - मनोरमाचे चेअरमन श्रीकांत मोरे
पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात अधिक आकर्षक आणि परिश्रम करणाऱ्यांना यश मिळविता येते. या ठिकाणी अंधारातील खेळाडू या स्पर्धेमुळे उजेडात आले असून बुद्धिबळ सारख्या खेळाला देखील प्रचंड प्रतिसाद पाहता बुद्धीबळाची स्पर्धा वेळोवेळी आयोजित करावेत कारण स्वेरीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाचे योग्य नियोजन होत असते. हे कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी केले.
         







सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशन, श्री रामजगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्था व चेस असोशिएशन, पंढरपूर व मोरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये स्व. मधुकरराव मोरे स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात डॉ. विश्वासराव मोरे यांनी बुद्धिबळ स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, परीक्षकांचे सहकार्य आणि स्वेरी स्टाफचे नियोजन यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगून अशा स्पर्धा वेळोवेळी व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पंढरपुरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले म्हणाल्या की, ‘स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला गती येते. यासाठी विश्वात घडामोडी काय चालले यासाठी विद्यार्थ्यांनी अपडेट राहावे. भविष्यात स्पर्धा परीक्षेचे महत्व अधिक वाढणार असून जो जास्त परिश्रम घेईल तोच विद्यार्थी स्पर्धेच्या युगात यशस्वी होईल.‘ असे सांगून स्पर्धकांचे अभिनंदन केले. बुद्धीबळ स्पर्धेत वय वर्षे ५ ते २१ वर्षे वयोगटातील एकूण ३२० स्पर्धकांनी बुद्धीबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

अनुक्रमे प्रथम क्रमांक रोहित बागवाले, शोभराज उत्पात, रघुनंदन तरंगे व समर्थ घोडके द्वितीय क्रमांक पृथ्वीराज वाघमोडे, किरण बाबर, सौरभ शिंदे, पृथ्वीराज चौहान, तृतीय क्रमांक विनायक सपताळे, अभिषेक बंडगर, अच्युत माने- देशमुख, पृथ्वीराज घाडगे, चतुर्थ क्रमांक वैभव गोडसे, आशिष सरवदे, प्रणव धावडकर, राजेंद्र ढेंबरे, पाचवा क्रमांक श्रेयस वाघमोडे, सोपान मुळे, प्रदीप मोरे, तनुष्का सुरवसे, सहावा क्रमांक निनाद कर्वे, सुजित बोरले, स्वानंद तपकिरे, हर्ष देशपांडे, सातवा क्रमांक आकाश मगई, गायत्री ओंकार, वेदश्री संत, सुदाम वनसाळे, आठवा क्रमांक पार्थ कुलकर्णी, हंडाळे खान रेरुई, सुबान जाधव, प्रसन्ना जगदाळे, नववा क्रमांक संस्कार भस्मे, वरद मोकाशी, सूर्यतेज घाडगे, सारिका बावळे, दहावा क्रमांक अभिजित गिड्डे, स्वप्नील हुल्ले, प्रेम बनसोडे, अखिलेश खरात तर उत्तेजनार्थ म्हणून पियुष धारवाडकर, समर्थ गोसावी, राजन मगई, अपूर्व सुरवसे, वेदांत ताड, चंद्रकला बिराजदार, प्रतिक जोशी व मयुरी करंजकर या एकूण ४८ बुद्धीबळ स्पर्धा विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. एकूण आठरा हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात विजेत्यांना देण्यात आली. 


यावेळी परीक्षक म्हणून युवराज पोगुल, इरान्ना जमादार, समेद हुल्ले, नानासाहेब देवकाते, मिलिंद बडवे, चव्हाण व सुहास जाधव यांनी काम पहिले. यावेळी चेस असोशिएशनचे सचिव शरद नाईक व इतर पदाधिकारी, अमर मोरे, पी.बी.कोडग, उत्तम नागणे, सौ. प्रेमलता रोंगे, डॉ. स्नेहा रोंगे, ज्योती खुळे, रवींद्र मोरे, स्वेरीचे विश्वस्त सुरज रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, सांस्कृतिक विभागचे प्रा. करण पाटील, प्रा. सुनिल भिंगारे, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व जिल्हातून आलेले स्पर्धक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com