सिंहगड मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा २.०'कार्यक्रम

पंढरपूर LIVE 29 जानेवारी 2019 

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ  
    पंढरपूर (प्रतिनिधीसावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितसिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा आयोजित “परीक्षा कि बात प्रधानमंत्री मोदी के साथ” हा लाईव्ह कार्यक्रम विद्यार्थ्यांना खविण्यात आला असल्याची माहिती प्राचार्या डॉ. उषा धपोला यांनी दिली.



   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काळ मंगळवार २९ जानेवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा 2.0' कार्यक्रम लाईव्ह संपूर्ण देशभर दाखवून विद्यार्थ्यांसोबत तसेच शिक्षकांसोबत संवाद साधला. या संवाद दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्यासाठी हा कार्यक्रम कुणाला उपदेश देण्यासाठी नाही. अभ्यासाठी वेळचे नियोजन खूप महत्वाचे आहे. स्पर्धा हि नेहमी रेकॉर्ड ब्रेंक करा, तुमच्या विचारात स्पष्टता असली पाहिजे. परीक्षा हा आपला उत्सव समजून द्या असे विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.


    पंढरपूर सिंहगड स्कूल मधील इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी या 'परीक्षा पे चर्चा 2.0' कार्यक्रमाचा लाभ घेतला हा कार्यक्रम पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कुलच्या प्राचार्या डॉ. उषा धापोला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल च्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com