पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गाचे काम संथगतीने... धुळीचे लोट... अपघातांना निमंत्रण.. विद्यार्थ्यांचे व जेष्ठांचे हाल..!!
पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019
आढीव प्रतिनिधी ÷
पंढरपूर-कुर्डूवाडी या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. धीम्या गतीच्या या कामामुळे मात्र या मार्गावरील आसमंतात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठत असल्याचे दिसून येते. प्रदुषणामुळे जेष्ठांना आजाराचे निमंत्रण मिळत आहे तर शालेय विद्यार्थ्यांचेही हाल होताना आढळत आहेत. अपुर्ण कामामुळे वाहतुकीची कोंडी होत असते, धुळीच्या लोटामुळे वाहनधारकांना समोरचे नीट दिसत नाही यामुळे या मार्गावर अपघातांना आयतेच निमंत्रण दिल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर तालुक्यातील आढीव, विसावा, बाभूळगाव येथील ग्रामस्थांना व या मार्गावरुन विविध शैक्षणिक संस्थांकडे जाणार्या हजारो विद्यार्थ्यांना दररोज पंढरपूरला ये - जा करावी लागते. याच मागारुन मराठवाडा, विदर्भातुन भुवैकुंठ पंढरीकडे दर महिन्याच्या एकादशीच्या महिना वारीला वारकरी पायी चालत येतात. परंतु या मार्गाचे काम करणार्या ठअएकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळेे ग्रामस्थांना, वाहनधारकांना व वारकर्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मोठ्या प्रमाणात उठणार्या धुळीमुळे पिकांचेचेही अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त बनला आहे. रस्त्यावर किरकोळ अपघातामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ठेकेदाराच्या कामावर मात्र याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना राजकीय नेत्यांनी जाब विचारावा व संबंधीत ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी. अशी मागणी जोर धरत असून जर वेळीच यावर उपाययोजना झाल्या नाहीत तर ग्रामस्थ व सामाजिक संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





