स्वेरीत येत्या रविवारी स्व. मधुकराव मोरे स्मृती चषक बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर LIVE 22 जानेवारी 2019
पंढरपुरात प्रथमच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होणार
पंढरपूर- सध्या स्पर्धेचे युग असून प्रत्येक विद्यार्थी नव्या युगाच्या नव्या प्रवाहात यशस्वीपणे तग धरला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होण्याबरोबरच त्यांना चालना मिळावे याहेतूने खेळाचा उद्देश आणि स्वेरीच्या पुढाकाराने सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशन, श्री रामजगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्था व चेस असोशिएशन, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्व मधुकराव मोरे स्मृती चषक बुद्धीबळ स्पर्धेचे येत्या रविवारी, दि २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूरचे सदस्य डॉ. विश्वासराव मोरे व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे भूषविणार आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रवींद्र मोरे, सौ. अनुराधा कोडग, सौ. अश्विनी नागणे, वृणाल मोरे, सौ. प्राजक्ता मोरे आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी चेस असोशिएशनचे अध्यक्ष दिगंबर सुडके, उपाध्यक्ष मोहन यादव, मिलिंद बडवे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी अधिकाधिक बुद्धीबळ स्पर्धकांनी सहभागी व्हावे. तसेच या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशनचे सचिव शरद नाईक (९४२३३३७३४६),अमर मोरे (८९९९९५९७५४), नानासाहेब देवकते (९२८४९६३००२) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




