25 जानेवारी रोजी पंढरीत विविध विकास कामांचे भुमिपुजन व तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळा समारंभाचे आयोजन... आमदार प्रशांतराव परिचारक यांची माहिती

पंढरपूर LIVE 21 जानेवारी 2019


पंढरपूर :- पंढरपूर येथे महाराष्ट्र् शासनाच्या वतीने विविध शासकीय कामांना मंजूरी मिळाली असून सदर कामांचा भुमिपूजन समारंभ ना. सुधीर मुनगंटीवार (मंत्री, वित्त आणि नियोजन, वने, महाराष्ट्र् राज्य) यांच्या हस्ते तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.वजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 25 जानेवारी 2019 रोजी होणार असल्याची माहिती आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली आहे.





* तुळशी वृंदावन:-
पंढरपूर येथील तुळशी वृंदावनासाठी काट्यावधीचा खर्च झालेला आहे. मागील 1 वर्षात हे काम पुर्ण झालेले आहे. येथील यमाई तलावाच्या पार्श्‍वभुमीवर अतिशय सुशोभीत आणि कल्पकरित्या या तुळशी वृंदावानची निर्मिती करण्यात येत आहे. या तुळशी वृंदावनामुळे पंढरीच्या वैभवात भर पडणार आहे. पंढरपूर महत्व, संत परंपरा आणि या वारकरी संप्रदायात तुळशीला असलेले महत्व लक्षात घेऊन या सर्व परंपरांचा समावेश या तुळशी वृंदावनामध्ये करण्यात आलेला आहे.




वारकरी संप्रदायात मान असलेल्या संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत सावता माळी आदी संतांची संगमरवरी शिल्पे याठिकाणी बसवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर येथे विविध प्रकारच्या तुळशीचे आणि विविध प्रकारच्या फुलांचीही लागवड करण्यात आली आहे. या तुळशी बनाच्या मधोमध संगीत कारंजे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तुळशी बनामध्ये पुर्ण बाजूला 24 फुटांची भव्य विठ्ठ्सीं;ल मुर्ती उभारण्यात आली आहे. संपुर्ण तुळशी वृंदावन सी.सी.टी.व्ही. च्या कक्षेत आणले असून दोन दिवसात एल.ई.डी. स्क्रीन बसवण्यात येणार आहेत. तुळशी बनाला बंदीस्त करण्यात आले असून तिन्ही बाजूंनी संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे. बाहेरील बाजूला काटेेरी तारेचे कूंपन तयार करण्यात आल्यामुळे तुळशी वृंदावन सुरक्षित झालेले आहे. तिन्ही बाजूंनी असलेल्या भिंतीच्या आतील बाजूला संत परंपरेतील चित्र कथा जे.जे.स्कुल ऑफ आट्।सींर्;च्या कलाकारांकडून रेखाट्ण्यात आलेली आहे.

 श्री.विठ्ठ्ल मुर्तीच्या चौथर्‍याच्या तिन्ही बाजूंनी पालखी सोहळ्याचे शिल्प फायबरमध्ये कोरण्यात आलेली असून समोरच्या बाजूला डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेली महिला भाविक आणि वारकर्‍यांचे फायबरचे शिल्प कोरण्यात आलेले आहे. अतिशय कल्पकरित्या या तुळशी वृंदावनाची रचना करण्यात आलेली असून सुमारे आठ महिन्यांपुर्वी वन विभागाकडू।सीं;न या वृंदावनाची उभारणीचे काम सुरू आहे. स्वागत कमान, महिला, पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छ तागृहांचीही उभारणी पुर्ण झालेली आहे. या तुळशी वृंदावनासाठी पंढरपूर  नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे.

* पंढरपूर-दिघंची-मायणी या रस्त्याचे भुमिपुजन.

पंढरपूर-दिघंची-मायणी हा रस्ता राष्ट्र्ीय महामार्गाचे यादीमध्ये घोषित झाला नव्हता. पंढरपूर शहरापासून जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने राज्य महामार्ग रस्ता म्हणून दुरूस्त करून मिळावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मा.चंद्रकांत पाटील यांचेकडे केली होती. त्यानुसार हायब्रीड अ‍ॅन्युट्सीं या योजनेमधून महाराष्ट्र शासनाने सदर रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला व मायणी-दिघंची-पंढरपूर या राज्यमार्गासाठी रू.278.00 कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर केला आहे. त्यामध्ये या रस्त्यासाठी पंढरपूर शहर येथील उपनगरांना जोडणारा रस्ता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ते ट्ाकळी बायपास या नियोजित  रस्त्याचे तीनपदरी डांबरीकरण करणे असे होते, परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी हा रस्ता शहराच्या तहसिल कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका पोलीस शन, उमा व सिंहगड महाविद्यालय, हेलिपॅड, कृषी कार्यालय तसेच नवीन उपनगरामधून जात असून या भागामध्ये सतत वर्दळ व वाहतुकीचा ताण मोठया प्रमाणात नागरीकांना होत होता. यामुळे या तीन पदरी रस्त्याचे कामामध्ये बदल करून या रस्त्याचे चारपदरी दुभाजकासह काँक्रीटीकरण करणेबाबत मागणी केली होती. या मागणीचा विचार करूनचंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास हा रस्ता दुभाजकासह चारपदरी करण्याचा तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले. जेणेकरून पंढ्रपूर शहराच्या भविष्यातील 25
वर्षाचा वाढता विस्तार पाहता या भागातील नागरीकांना त्याचा फायदा होईल. अशा या रस्त्याचे भुमिपुजन होणार आहे.



तसेच जिल्हा हद्दीतील मुळशी-अरण-करकंब-व्हळे-कौठाळी- पंढरपूर (या रस्त्यावरून श्री.एकनाथ महाराज पालखी येते) या रस्त्यासाठी रक्कम रू.204.00 कोटी इतका निधी मिळाला असून सदर रस्त्याचे भुमिपूजन देखील यावेळेस होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. तसेच पंढ्रपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर येथे रू.2 कोटी 32 लाख रूपये खर्च करून नवीन विश्रामृगह बांधण्यात आलेले आहे. त्याचाही लोकापर्ण होणार असून यमाई तलाव तुळशी वृंदावन उद्यानाचा लोकार्पण समारंभ व रस्त्याचे
भुमिपुजन असे अनेक विविध विकास कामे महाराष्ट्र् शासनातर्फे राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com