गाडीची काच फोडून गाडीतील 20 हजार रूपये रोख रक्कमेसह महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग चोरून चोरटयांचे पलायन... पंढरीतील हाॅटेल राधेशच्या पार्किंगमध्ये दिवसाढवळ्या घडले क्राईम!

पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019



चारचाकी गाडीची बंद काच कटावणी किंवा लोखंडी बारने फोडून गाडीतील 20 हजार रुपयांची रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना आज पंढरीत घडलीय. दिवसाढवळ्या हा गुन्हा घडलाय.

याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार

सांगली येथील पांडुरंग नरळे हे गृहस्थ आज पंढरीतील तहसिल कार्यालयात एका खरेदीच्या व्यवहारासाठी आले होते. ते आज दुपारी राधेश हाॅटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.
 येथील लिंकरोड वर असलेल्या हाॅटेल राधेश मधील पार्किंगमध्ये त्यांनी आपली इनोव्हा गाडी पार्क केली होती. दुपारी २:४९ च्या दरम्यान ते जेवण असताना ही चोरी घडली.

सदर चोरीचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असल्याचे समजते. दोघेजण दुचाकीवर आले. मागच्याने खाली उतरुन पार्किंगकडे जाऊन हातातील कटावणी किंवा लोखंडी बारने सदर गाडीची काच फोडली व परत आला. नंतर दुचाकीवरचा पुढचा इसम गाडीकडे गेला. गाडीतुन बॅग घेतली व दुचाकीवरून दोघेही क्रांतीसिंह नाना पाटील चौकातुन अकलुज मार्गे निघून गेले.

ही घटना काहीच वेळात नरळे यांना समजली. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे कामकाज सुरू आहे.


कटावणी किंवा लोखंडी बारने फोडून गाडीतील 25  हजार रुपयांची रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग घेऊन चोरट्यांनी चोरुन नेली.अशी प्राथमिक माहिती नरळे यांच्या नातेवाईकांकडून पंढरपूर लाईव्हला मिळाली होती. यानंतर पंढरपूर लाईव्हने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता 20 हजार रुपये व महत्वाचे कागदपत्रं असलेली बॅग चोरट्यांनी चोरुन नेली असून चोरीच्या गुन्ह्याखाली अज्ञात आरोपींविरुध्द चोरीच्या गुन्ह्याखाली भा.द.वि. कलम 379 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार आर.डी. शेख यांनी दिली. पुढील तपास पोलिस नाईक गणेश पवार हे करत आहेत.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com