बिजापुरच्या डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयाचा पाकणीत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

पंढरपूर LIVE 25 मे 2018


तब्बल बावीस वर्षानंतर ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

पंढरपूरः- बिजापूर मधील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पाकणीत नुकताच ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न झाला. तब्बल २२ वर्षाच्या अंतराने सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्रित आले आणि जाग्या झाल्या ‘त्या’ जुन्या आठवणी! तत्कालीन प्राचार्य राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. व्ही.आर. देवगिरी यांच्या कडक शिस्त पासून ते विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या व वेळ, परिस्थिती पाहून, समजून घेणारे गुरुवर्य सौ पाटील, प्रा. महांबरी, प्रा. पाटील, प्रा. मुजावर यांच्या आठवणी तब्बल बावीस वर्षानंतर ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ या कार्यक्रमात निघाल्या. 










            मागील वर्षापासून माजी विद्यार्थी मेळावा करण्यासाठी नियोजन होत होते.भारतभर विखुरल्या गेलेल्या विद्यार्थ्याना एकत्रित आणण्याचे अवघड कार्य करण्याचा विडा खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम स्व. महेश कोरे यांनी उचलला. परंतु त्यांच्या अकस्मात निधनाने अर्धवट राहिलेले हे कार्य सोशल मेडीयाचा आधार घेत विजापूर, गुलबर्गा, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे सह इतर जिल्ह्यातील सर्व मित्रांना सहज शक्य झाले आणि अखेर सोलापूर –पुणे हायवे लगत असणाऱ्या पाकणी पासून दोन किमी. अंतरावरील ‘अभिषेक मळा’ येथे ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ नामक कार्यक्रम घेण्याचे ठरले.महेश डोंगरेच्या ‘प्रभू तु दयाळू....’ या सुमधुर भक्तीगीताने मेळाव्यास सुरवात झाली.दिलीप मोकाशी यांनी पक्ष्यांचा आवाज हुबेहूब काढून बावीस वर्षातील आठवण पुन्हा ताजी केली. सुधीर सूर्यवंशी यांनी ‘नफरत की लाठी तोडो...’, विकास जावळे यांनी ‘सोचेंगे तुम्हे प्यार....’, निसार कडेगावकर आणि सुनील साठे यांनी ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा .....’ यांनी तालात गीत गायले तर प्रवीण साठे यांची कन्या समृद्धी हिने आणि सौरभ भंडारकवठेकर याने सैराट गीतावर उत्कृष्ठ नृत्य करून शोभा वाढविली. कुटुंबासह सहभागी झालेल्या या मेळाव्यात शिक्षकांसह कोणी प्रशासकिय अधिकारी, पत्रकार, पोलीस अधिकारी, तर कोणी स्वतःच शैक्षणिक संस्था निर्मिती केली होती. ‘जाना था जपान, पहुंच गये चीन’ अशीही काहींची अवस्था झाली होती. त्यामुळे काहीजण शिक्षणक्षेत्र सोडून स्वतःची कंपनी. मार्केटिंग फिल्ड, एस.टी. महामंडळ यामध्ये स्थिरावले होते. तसेच काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. काही मुली पतीला सहकार्य करण्यासाठी जॉब स्विकारला होता आणि हे सर्वचजण माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने ‘अभिषेक मळा’मध्ये एकत्रित आले होते. काहीजण दोनाचे तीनतीनाचे चार झाले होते तर काहीजण नोकरी करत करत पी.एच.डी. संशोधन करण्यात गुंतलेले होते. आज मात्र ते सर्वजण बिजापुर मधील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर मनसोक्त झुलत होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पैसे सर्वचजण मिळवतातपरंतु अनुभव हा स्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी स्वतःलाच प्रचंड परिश्रम करण्याची गरज आहे. कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. बी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेळ प्रसंगी आम्हाला घडविण्यासाठी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचा सुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलो त्यावेळी तेथील शिस्त व आमच्यावर केलेले संस्कार याचा खूप फायदा झाला. हे लक्षात आले.’ असे उदगार काढले. यावेळी काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर आसू होते. हे स्पष्टपणे जाणवले. आचार विचारांची देवाण घेवाण करत असतानाच दिवस मावळला. आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम समजून नटून थटून आले होते. दिवसभर आयोजिलेल्या कार्यक्रमात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काहींनी भाषण ठोकले तर काहींनी जुन्या– नव्या गीतांचा सुरात गीत गायले. शशिकला उमराणी यांनी कर्नाटकातूनच ऐन कार्यक्रमातच भ्रमनध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात जाकीर पठाण, मनोज जोशी, संजय पिचके, विठ्ठल कोळवले, प्रकाश स्वामी, सोमनाथ बोरांचे, नाथा जावीर, प्रवीण जाधव, प्रशांत मिरगणे, नूरअहमद अन्सारी, सुभाष ढोकळे, दतात्रय कसबे, रविकांत मिरगणे, संजय सुडे, गुलाबसिंग चव्हाण, शहाजी बिडवे, धनंजय जाधव, प्रवीण साठे, संतोष हालकुडे यांच्यासह बी.एड.महाविद्यालयातील १९९६ मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी मेळाव्यात सुनील साठे यांनी प्रत्येक मित्राच्या भाषणानंतर समर्पक शेर- शायरी गझल याची जोड डेत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला जिवंतपणा आणला तर उपस्थितांचे आभार सौ. अनिता कारंडे-महामुनी यांनी मानले.









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com