N- "Retired but not Tired" अर्थात "सेवानिवृत्त युवा" संमेलन (राज्यस्तरीय ) (शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकासासाठी)
बऱ्याच जणांना ऐन उमेदीच्या काळात करीयर व अर्थार्जनाच्या धावपळीत, समाजासाठी काही करता येत नाही. तसेच राज्य, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सैनिक वगैरे ह्यांना नियमाच्या बंधनामुळे इच्छा असून सामाजिक काम करताना मर्यादा असतात.
ह्या सेवानिवृत्त लोकांकडे ज्ञान, प्रशासकीय किंवा व्यवस्थापन कौशल्य आहे, निर्णय क्षमता, साधनसमृद्धी (resources) आहे आणि मुख्य म्हणजे वेळ ही आहे.
या वयात माणूस कौटुंबिक नात्यातील सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख होऊन, सार्वजनिक कल्याणाचा विचार करीत असतो.
काही लोक ह्याचा विनियोग, एकांड्या शिलेदाराप्रमाणे समाजासाठी, विधायक, सामाजिक कामासाठी करताना दिसतात. तर काही लोक ध्येय न गवासल्यामुळे ताणग्रस्त / भावना हेलकावणाऱ्या किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या दूरदर्शन मालिका बघण्यामध्ये, सत्संग व बागेतील बाकड्यावर बसून निरर्थक गप्पा मारण्यात व्यतीत करतात. कर्मयोगाविना अध्यात्मिक जीवन अपूर्ण आहे.
अश्या सर्व "Retired but not Tired" म्हणजे सेवानिवृत्त पण मानसिकदृष्ट्या युवांचे (तरुणांना लाजवेल अश्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे) आम्ही संमेलन आयोजित केले आहे. हा अभिनव उपक्रम फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स आणि कृषी व सहकार व्यासपीठ, पुणे (यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान ) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
ज्यांना "शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकास" ह्या क्षेत्रात काम करावयास आवडेल त्यांनी कार्यक्रमास जरूर येणे.
कोणी सांगावे ही एक तुमच्या आयुष्याची नवीन पहाट, तुमच्या कर्तृत्वाची समाजाला नवीन ओळख व चौथ्या इनिंगची सुरुवात असेल.
दुसऱ्यांसाठी जगण्याची आकांक्षा असेल, तर वाढलेले वयही वरदान ठरते. चला नकारात्मकडून सकारात्मकडे. जेष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे. ह्या संमेलनांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नावाजलेले तज्ञ येणार आहेत.
कार्यक्रम तपशील:
1. दिनांक : 9 जुलै 2017, रविवार
2. वेळ: 3 ते 6 वा.
3. स्थळ: 2183, सदाशिव पेठ, विशाल सह्याद्री सदन, टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागे, पुणे- 411030
4. तज्ञांची व विषयः
a) कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक, अध्यक्ष भूमाता
किसान क्रांती संप- यशापयश व पुढील दिशा
b) डॉ. कुमार सप्तर्षी, अध्यक्ष युवक क्रांती दल
आंदोलनाचे शास्त्र व शस्त्र
c) श्रीमती शांता रानडे, राष्ट्रीय कौन्सिल सभासद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
शेतीतील लक्ष्मीचे योगदान व प्रश्न
d) श्रीमती कल्पनाताई साळुंके, अध्यक्षा पाणी पंचायत
जलसाक्षरता आणि पंचक्रोशी विकास
e) डॉ. मुकुंदराव गायकवाड, कुलपती, अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ
ग्रामीण स्वंयरोजगाराची संकल्पना व संधी
5. प्रवेश: मोफत
Satish Deshmukh, BE (Mech.)
President: Forum Of Intellectuals
G-65, Aditya Nagar, Gadital,
Hadapsar, Pune-411028.
Maharashtra State, India
Contact Details:
a) E-mail: deshmukhsk29@gmail.com
b) Cell No.: +91 9881495518
c) Blogger: deshmukhsk29.blogspot .com
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


