पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटीलांशी साधला संवाद...
पंढरपूर Live:
विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) कोल्हापूर परीक्षक मा. विश्वास नांगरे पाटील यांचेशी आज पंढरपूर Live चे मुख्यासंपादक भगवान वानखेडे यांनी संवाद साधला.
पंढरपूरच्या काही प्रमुख प्रश्नासंदर्भात चर्चा केली, पंढरपूर शहरातील बंद पडलेले सिग्नल व्यवस्था, पार्किंग प्रश्न व वाहतूक प्रश्नासंदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत लवकरच उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
यावेळी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, डी वाय एस पी निखिल पिंगळे, पो. उपअधीक्षक मिलिंद मोहिते, पंढरपूर शहर पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, ता.पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, नागराध्यक्ष सौ. साधनाताई नागेश भोसले, आदी अनेक नागरसेक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, सचिव संजय नवले, सोमनाथ नवले आदी उपस्थित होते.
आषाढी यात्रा नियोजन संदर्भात येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आज मा. विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिक, वारकरी प्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार यांच्याशी संवाद साधला
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111