"वाचना मुळे आयुष्यातील प्रश्न सोपे होतात" ..... कवी रवी सोनार

लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाकवी कालिदास जयंती साजरी.
पंढरपूर प्रतिनिधी:-
"विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील वचना बरोबरच अवांतर वाचन करणे गरजेचे असून वाचनामुळे आयुष्यतील येणाऱ्या समस्या व प्रश्नांची धार बोचट होते आणि प्रश्न सोपे होतात" असे मत येथील साहित्य वर्तुळाचे संस्थापक अध्यक्ष कवी रवि सोनार यांनी व्यक्त केले. ते एकलासपूर येथे लोकमंगल सार्वजनिक वाचनालय आयोजित कवी कुलगुरू कालिदास दिनानिमित्ताच्या कवि संमेलनात बोलत होते. या कवि संमेलनात आंबे येथील युवा कवी गणेश गायकवाड यांनीही काव्यगायन करून विद्यार्थी आणि शिक्षकांची मने जिंकली. तर हास्य कलाकार मोहनराव शिंदे यांनी कवीच्या कवीता वाचन करतानाच विडंबन काव्य व विनोद साजरे करून हास्याचे फवारे उडवले व सर्वाना मंत्रमुग्ध केले. लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात मा. योगेश ताड व मा. वसंतराव चोले हे मान्यवर व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. या कवी संमेलनाच्या प्रास्ताविक शाखाआधिकारी श्री संतोष काळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल संस्था पंढरपुरच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111